हरमनप्रीत कौर, मेग लॅनिंग आणि हीथर नाइट (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

फेब्रुवारीमध्ये महिला टी-20 विश्वचषक होण्यापूर्वी भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) संघात तिरंगी मालिका खेळली जाणार आहे. या दरम्यान तिन्ही संघ प्रत्येकी 4 सामने खेळतील आणि पहिल्या दोन स्थानावर राहिलेले संघ फायनल सामना खेळतील. टी-20 विश्वचषक पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होईल, परंतु त्याआधी ऑस्ट्रेलियामधेच तिरंगी मालिकेचे (Tri-Series) आयोजन केले जात आहे. तिरंगी मालिका खूप महत्वाची स्पर्धा असणार आहे. संघ संयोजित करण्यास हे मदत करेल किंवा ऑस्ट्रेलियन विकेट्सवर त्यांना किती लक्ष्य देणे आवश्यक आहे हे समजेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारत तिरंगी मालिका सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे आणि त्याने परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सराव सत्रांची निवड केली आहे.

या स्पर्धेची सुरुवात भारत आणि इंग्लंड महिला संघासह होईल. हा सामना मनुका ओव्हल, कॅनबेरामध्ये खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होईल. भारतीय चाहते हा सामना Sony ESPN आणि Sony ESPN HD वर लाईव्ह पाहू शकतात.

मेलबर्न येथे कॅनबेरा आणि जंक्शन ओव्हल या दोन ठिकाणी तिरंगी मालिका खेळली जाईल. इंग्लंडचे नेतृत्व हेदर नाईट आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मेग लॅनिंग करणार असून 21 फेब्रुवारीपासून अंतिम कसोटी सुरू होण्यापूर्वी ही सर्वात रोमांचक घटना ठरली पाहिजे.

असा आहे भारत-इंग्लंड महिला संघ

टीम इंडिया: हर्लीन देओल, स्मृती मंधाना, जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, तान्या भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, नुझत पारविन, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, शाफाली वर्मा, रिचा घोष.

इंग्लंड: डॅनियल व्याट, अ‍ॅमी एलेन जोन्स (विकेटकीपर), टैमी ब्यूमोंट, हीथर नाइट (कॅप्टन), नताली सायव्हर, कॅथरीन ब्रंट, लॉरेन विनफिल्ड, जॉर्जिया एल्विस, अन्या श्रबसोल, केट क्रॉस, फ्रॅन विल्सन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, फ्रीया डेव्हिस, मॅडी विलियर्स.