Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

IND vs NZ 5th T20I Highlights: भारताने न्यूझीलंडला 5-0 ने केले पराभूत, 7 धावांनी जिंकला शेवटचा सामना

क्रिकेट Priyanka Vartak | Feb 02, 2020 04:23 PM IST
A+
A-
02 Feb, 16:11 (IST)

टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड संघाला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात किवी संघाचा 5-0 असा मालिकेत क्लीन स्वीप केला आणि पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत सर्व सामने जिंकणारा हा पहिला संघ बनला. 

02 Feb, 15:49 (IST)

भारताने दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्यासमोर, किवी संघाने 15 षटकांनंतर पाच विकेट गमावून 122 धावा केल्या आहेत. विजयासाठी अद्याप संघाला 30 चेंडूंत 42 धावांची गरज आहे.

02 Feb, 15:37 (IST)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने किवी फलंदाज डेरील मिशेलला दोन धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बोल्ड केल्यानंतर भारताची सामना आशा पुन्हा जिवंत झाली. न्यूझीलंडला अद्याप विजयासाठी 36 चेंडूत 45 धावांची गरज आहे.

02 Feb, 15:25 (IST)

नवदीप सैनीने भारताला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. सैनीने टिम सेफर्टला अर्धशतक पूर्ण करताच 50 धावांवर संजू सॅमसनकडे कॅच आऊट केले. 

02 Feb, 15:15 (IST)

शिवम दुबेने भारतासाठी दहावी ओव्हर टाकली. दुबेच्या या षटकात किवी फलंदाजांनी 3षटकार, दोन चौकार, एक षटकार आणि एक फ्री हिटसह एकूण 34 धावा केल्या. तीन षटकांनंतर तीन गडी गमावून संघाची धावसंख्या 98 धावा आहे. टीमकडून टीम सेफर्ट 36 आणि रॉस टेलर 41 धावा करून खेळत आहे.

02 Feb, 14:58 (IST)

भारताच्या 164 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी संघाने पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर तीन गडी गमावून 41 धावा केल्या आहेत.

02 Feb, 14:49 (IST)

भारताच्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडने पाच षटकांनंतर तीन गडी गमावून 32 धावा केल्या आहेत. विकेटकीपर-फलंदाज टिम सेफर्ट 8 आणि रॉस टेलर 6 करून खेळत आहेत.

02 Feb, 14:38 (IST)

17 च्या धावसंख्येवर किवी संघाला तिसरा धक्का बसला. टॉम ब्रूसला संजू सॅमसनने शून्यावर धावबाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. 

02 Feb, 14:35 (IST)

न्यूझीलंडला सलग दुसरा धक्का बसला. नवदीप सैनीने दुसरा किवी सलामी फलन्दाज कॉलिन मुनरोला 15 धावांवर बोल्ड केले. 164 धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करणाऱ्या किवी संघाने 17 धावांवर दुसरी विकेट गमावली. 

02 Feb, 14:30 (IST)

टीम इंडियाने दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलला दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केले. गप्टिलने आज 2 धावा केल्या. 

Load More

भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना आज माउंट मौंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात खेळला जाईल. भारतीय संघ पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे आणि 5-0 च्या फरकाने जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. या मालिकेचा पाचवा सामना किवी संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्या होम ग्राऊंडवर खेळला जात आहे, तरी त्याला या सामन्यातून बाहेर राहावे लागू शकते. तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान विल्यमसनला खांद्यावर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चौथ्या सामन्याला मुकावे लागले होते.

या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान किवींचा सहा विकेटने पराभव केला होता, तर दुसर्‍या सामन्यात 15 चेंडू बाकी असताना त्यांचा सात विकेटने पराभव झाला होता. तिसर्‍या सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अंतिम षटकात नऊ धावांचा बचाव केला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. मात्र, गोलंदाजीतही संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज टीम साऊथी सुपर षटकात 18 धावांचा बचाव करू शकला नाही आणि भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माने सलग दोन षटकार ठोकत भारताला सामना जिंकवून दिला. (सामन्याचे थेट स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

चौथा सामनाही सुपर ओव्हरपर्यंत गेला आणि यात देखील किवी संघाला जिंकता आले नाही. किवी संघ शेवटच्या षटकात सात धावा करू शकला नाही आणि भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने सात धावांचा बचाव करण्याव्यतिरिक्त दोन गडीही बाद केले. या सामन्यात भारतीय संघाने आपले वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली होती आणि असे असूनही न्यूझीलंडचा संघ जिंकू शकला नाही.


Show Full Article Share Now