KXIP vs MI, IPL 2019: 'किंग्ज इलेव्हन पंजाब'ने जिंकला टॉस, क्षेत्ररक्षणाचा निर्णय
MI Vs KXIP (File Photo)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे. चंदीगडच्या मैदानावर आज हा सामना रंगणार आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने (R Ashwin) टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंजाबच्या संघात बदल करण्यात आले असून मुंबई संघ त्यांच्या ठरलेल्या खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. IPL 2019 Live Cricket on Hotstar and Star Sports: इथे पाहू शकाल 'आयपीएल'च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण

टॉस

यंदा आयपीएलचा १२ वा सीझन रंगत आहे. आयपीलचे सामने रसिकांना हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या स्वरूपात पाहता येतील.