KKR Vs MI, 5th Match: कोलकाता नाईट राईडर्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) पाचवा सामना आज कोलकाता नाईट राईडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट राईडर्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानात (M. A. Chidambaram Stadium) पार पडणार आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन (Eoin morgan) करणार आहे. तर, मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहीत शर्मावर (Rohit Sharma) आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे चौदावे हंगाम प्रेक्षकांविना पार पडणार आहेत.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. कोलकाता नाईट राईडर्स आणि मुंबई इंडियन्स संघातील आयपीएलचा पाचवा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- RR vs PBKS 4th Match: आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात Chris Gayle याने रचला षटकारांचा विक्रम

संघ-

कोलकाता नाईट राईडर्स:

इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नगरकोटी, संदीप वॉरियर, प्रशांत कृष्ण, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, साकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, पवन नेगी.

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पंड्या, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, अ‍ॅडम मिलने, नॅथन कॉल्टर नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन, अर्जुन तेंडुलकर.