Virat Kohli (Photo Credit - X)

ICC Men’s ODI Batter Ranking: आयसीसीने बुधवारी ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. याचा फायदा विराट कोहलीला (Virat Kohli) झाला आहे. कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (ICC Chamipons Trophy 2025) सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. कोहलीला रँकिंगद्वारे याचे बक्षीस मिळाले. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल (Shubam Gill) अव्वल आहे. तर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. पण आता तो पाचव्या स्थानावर आला आहे. (हे देखील वाचा: Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील मॅच रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच गणित बदललं? सेमीफायनलची लढत आणखी रंजक होणार)

भारताने 6 विकेट्सने जिंकला सामना

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूंचा सामना करत नाबाद 100 धावा केल्या. कोहलीच्या या खेळीत 7 चौकारांचाही समावेश होता. सामन्यादरम्यान रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहलीने जबाबदारी घेतली आणि भारतासाठी शेवटपर्यंत खेळला. टीम इंडियाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.

एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू 

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचे वर्चस्व आहे. यामध्ये शुभमन गिल अव्वल स्थानावर आहे. त्याला 817 रेटिंग मिळाले आहे. बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 770 रेटिंग मिळाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 757 रेटिंग मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहलीला 743 रेटिंग मिळाले आहे.

एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद शमीला फायदा

दुखापतीमुळे शमी बराच काळ टीम इंडियाबाहेर राहिला. मात्र, आता त्याने पुनरागमन केले आहे. शमीने अनेक वेळा भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दोन सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. याचा फायदा शमीला एकदिवसीय क्रमवारीत झाला आहे. यापूर्वी तो 15 व्या स्थानावर होता. पण आता तो 14 व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा खेळाडू महेश थीकशना अव्वल स्थानावर आहे.