KKR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलग पाचवा विजय; कोलकाता नाईट राईडर्स 8 विकेट्सने पराभूत
किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: Twitter/IPL)

KKR Vs KXIP 46th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 46 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने कोलकाता नाईट राईडर्सच्या संघाला (Kolkata Knight Riders Vs Kings XI Panjab) 8 विकेट्स पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाताच्या संघाला 20 षटकात केवळ 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (66) आणि ख्रिस गेल (51) यांनी अर्धशतक ठोकले आहेत. पंजाबचा हा सलग पाचवा विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाताच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. नितीश राणा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी (7) दिनेश कार्तिकला (0) बाद झाले. परंतु, कर्णधार इयॉन मॉर्गन आणि शुबमन गिल यांच्या 80 धावांची भागिदारीच्याय जोरावर कोलकाच्या संघाने 149 धावपर्यंत मजल मारता आली. हे देखील वाचा- IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; कर्णधार रोहित शर्मा आयपीएल मधून बाहेर होण्याची शक्यता

ट्वीट-

 या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल आणि मनदीप सिंग या दोघांनी पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. लोकेश राहुल 28 धावांवर बाद झाल्यानंतर क्रिस गेल आणि मनदीप सिंगने डावाला अपेक्षित गती दिली. या दोघांच्या अर्धशतकामुळे पंजाब संघाला विजय मिळवता आला आहे.