Photo Credit- X

Jay Shah: आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून जय शाह (Jay Shah) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले(Greg Barclay) यांचा कार्यकाळ संपत आहे आणि काल ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयसीसीचे(ICC) पुढील चेअरमन म्हणून जय शाह यांच्याकडे लागल्या आहेत. (हेही वाचा: Virat Kohli 16 Years in International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'किंग कोहलीने' पूर्ण केली 16 वर्षे, जय शहा यांनी दिल्या खास शुभेच्छा)

ग्रेग बार्कले हे सलग चार वर्षे आयसीसीचे चेअरमन राहिले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते पहिल्यांदा या पदावर निवडून आल्या. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्ष पद रिकामे राहिल. आयसीसीचे नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(हेही वाचा: Jay Shah Man Of His Words: जय शाहने आपले वचन केले पुर्ण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये फडकवला ध्वज; पाहा व्हिडिओ)

जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत, असं सांगण्यात येत आहे. सध्या ते आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे शहा यांचे सर्व 16 मतदान सदस्यांशी चांगले संबंध आहेत. जय शाह यांनी 2019 मध्ये बीसीसीआय सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 2025 मध्ये त्यांना या पदावर 6 वर्षे पूर्ण होतील. तसेच ते जर नवे अध्यक्ष झाले तर. सर्वात तरूण आयसीसी अध्यक्ष म्हणून ते ओळखले जातील. जय शाह वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष असतील. शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून एन्ट्री

जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.