
MI vs RCB IPL 2025: मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातीस इंडियन प्रीमियर लीग 2025 चा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मुंबई इंडियन्स (MI) च्या सपोर्सटचा आज आनंद गगनात मावेना असं चित्र असेल. कारण ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा होत्या तो आज मैदानावर खेळणार आहे. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2025 च्या (IPL 2025) सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता. तो रविवारी सरावाला उपस्थित राहिला. आज ही मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 सामन्यासाठी सरावात नेट मध्ये तो गोलंदाजी करताना पहायला मिळाला. बुमराहच्या उपलब्धतेची पुष्टी मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी केली.
जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससोबत सराव सुरू केला
Jasprit bumrah bowling in nets for Mumbai Indians before match vs RCB.🥶💙
RCB is already scared🥵 pic.twitter.com/h5IVCXH096
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 6, 2025