Aditi Hundia Instagram Post: मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे ईशान किशन झाला निराश; परंतु, त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया हीने इन्स्टाग्रामवर केली 'अशी' पोस्ट
Aditi Hundia And Ishan Kishan (Photo Credit: Twitter)

दुबई आतंरराष्ट्रीय मैदानात सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळरु आणि मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळरूच्या संघाने तुफान फटके बाजी करत मुंबईसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला मुंबईचा संघ सुरुवातीला डगमगताना दिसला. त्यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) आणि कायरन पोलार्ड या दोघांनी फटकेबाजी सामन्याच चित्रच पालटले. मात्र, अखेरच्या 2 षटकात बंगळरूच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामना टाई केला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव झाला. दरम्यान, मुंबईच्या पराभवामुळे निराश झालेल्या ईशान किशनसाठी त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने (Aditi Hundia) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे.

बंगळरू विरुद्ध खेळण्यात आलेला सामना मुंबईच्या हातातून निसटतो की काय? असे वाटत असताना इशान किशन आणि पोलार्ड या दोघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, इशान किशनने केवळ 58 चेंडूत 99 ठोकल्या. यात 9 षटकारांचा समावेश आहे. परंतु, मुंबईच्या संघाला अखेरच्या षटकात 2 चेंडूत 5 धावा पाहिजे असताना ईशान किशन झेलबाद झाला. ईशान किशन 99 धावांवर बाद झाल्यानंतर त्याचे शतकही हुकले. त्यामुळे तो नाराज झाल्याचे दिसला. मात्र, त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने ईशानच्या खेळीचे कौतूक केले आहे. तसेच मला तुझा अभिमान वाटतो, अशी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. हे देखील वाचा- Rohit Sharma May Set New Record: आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणखी एका विक्रमापासून केवळ 10 धावा दूर

अदिती हुंडियाची इंस्टाग्राम स्टोरी-

अदिती हुंडिया मिस इंडिया 2017 ची फायनलिस्ट आहे. तसेच 2018 मध्ये तीने सुपरनॅचुरल इंडियाचा मान पटकावला आहे. आयपीएलच्या 12 व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडलेल्या अंतिम सामन्यानंतर प्रसारमाध्यमात झळकली होती. तसेच प्रसारमाध्यमात झळकणारी तरूणी नेमकी कोण आहे? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, ही ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.