
Ireland National Cricket Team vs West Indies Cricket Team 1st ODI 2025 Live Streaming: एकदिवसीय सामन्यांपासून दीर्घ विश्रांतीनंतर, आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट संघ (Ireland vs West Indies) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी 21 मे रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डब्लिनमधील क्लोन्टार्फ क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.15 वाजता खेळला जाईल. वेस्ट इंडिज संघ दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा लय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. वेस्ट इंडिजने शेवटची मालीका 50 षटकांची खेळली होती. 2024मध्ये खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या मालीकेत त्यांनी विडय मिळवला होता. जिथे त्यांनी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध सलग दोन एकदिवसीय सामने जिंकले. याशिवाय, 2025 च्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावल्यानंतर ते मालीका जिंकण्याचा प्रयत्न करतील.
दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना होण्याची अपेक्षा आहे.
आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 21 मे रोजी डब्लिनमधील क्लोन्टार्फ क्रिकेट क्लब ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.15 वाजता खेळला जाईल. तर टॉस अर्धा तास आधी होईल.
आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामना कुठे पहाल?
आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर प्रसारित केला जाणार नाही. क्रिकेट चाहते फॅनकोड अॅपवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
दोन्ही संघांचे खेळाडू
वेस्ट इंडिज संघ: ब्रँडन किंग, एविन लुईस, कीसी कार्टी, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोस्टन चेस, अमीर जांगू, जॉन कॅम्पबेल, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, जेडेन सील्स, ज्वेल अँड्र्यू, जेडिया ब्लेड्स, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज.
आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राइन, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, थॉमस मेयेस, केड कार्माइकल, लियाम मॅकार्थी.