Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team, 2nd ODI Match 2025 Video Highlights:   झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील  (ODI Series) दुसरा सामना आज म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club)  खेळवण्यात आला. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा सहा विकेट्सने पराभव केला. यासह, आयर्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक मालिका अपेक्षित आहे. या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन (Craig Ervine) करत आहे. तर आयर्लंडचे नेतृत्व पॉल स्टर्लिंगकडे (Paul Stirling) आहे.

ZIM विरुद्ध IRE सामन्याचे संपूर्ण व्हिडीयो हाईलाईट्स पहा

संपूर्ण झिम्बाब्वे संघ 49 षटकांत फक्त 245 धावांवर ऑलआउट झाला. झिम्बाब्वेकडून स्टार फलंदाज वेस्ली माधेवरे यांनी 61 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, वेस्ली माधेवरेने 70 चेंडूत सहा चौकार मारले. वेस्ली मधवेरे व्यतिरिक्त, अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदरने 58 धावा केल्या.

दुसरीकडे, मार्क अडायरने आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आयर्लंडकडून मार्क अदायरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क अडायर व्यतिरिक्त, कर्टिस कॅम्फरने तीन विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंड संघाला 50 षटकांत 246 धावा कराव्या लागल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त 27 धावांवर पहिला मोठा धक्का बसला. आयर्लंड संघाने 48.4 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. आयर्लंडकडून कर्णधार पॉल स्टर्लिंगने 89 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, पॉल स्टर्लिंगने 102 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. कर्टिस कॅम्फर व्यतिरिक्त कर्टिस कॅम्फरने 63 धावा केल्या.

त्याच वेळी, वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेकडून ट्रेवर ग्वांडूने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. ट्रेवर ग्वांडू व्यतिरिक्त, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00 वाजता हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाईल.