IPL MVP Award Winners List: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-20 स्पर्धा म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये जगभरातील मोठे खेळाडू खेळतात आणि उत्तम प्रदर्शन करतात. या स्पर्धेत आतापर्यंत फक्त परदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. 2013 मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (Player of the Tournament) किंवा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (Most Valuable Player) अवॉर्डची सुरुवात झाली. विशेष म्हणजे आजवर फक्त दोन भारतीय खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला आहे. हंगाम संपल्यावर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला MVP पुरस्कार देण्यात येतो. 2013 मध्ये शेन वॉटसनने आयपीएलमध्ये (IPL) MVP पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला होता. 2013 पूर्वी हा पुरस्कार मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून ओळखला जात असायचा. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर वॉटसनने स्पर्धेच्या उद्घाटन आवृत्तीमध्ये देखील हा पुरस्कार जिंकला होता. (IPL One Season Wonder: एकेकाळी आयपीएल संघासाठी हुकमी एक्का असलेल्या ‘या’ 5 नायकांचा आज पडलाय विसर, जाणून घ्या)
आयपीएलमध्ये आतापर्यंत नऊ वेगवेगळ्या खेळाडूंनी सर्वाधिक मूल्यवान खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे, वॉटसन, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल या त्रिकूटांनी दोन किंवा अधिक वेळा जिंकला आहे. रॉयलसाठी दोन्ही वेळा वॉटसनने हा पुरस्कार जिंकला आहे तर नरेन आणि रसेल यांनी दोन्ही वेळा कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा पुरस्कार जिंकला आहे. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे तर आजवर टूर्नामेंट प्लेअर किंवा सर्वाधिक मूल्यवान खेळाडूचा हा पुरस्कार सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी जिंकला आहे. पहा आयपीएल MVP पुरस्कार विजेत्यांची यादी:
आयपीएल सीजन | MVP पुरस्कार विजेता | संघ |
2008 | शेन वॉटसन | राजस्थान रॉयल्स |
2009 | अॅडम गिलक्रिस्ट | दिल्ली कॅपिटल्स |
2010 | सचिन तेंडुलकर | मुंबई इंडियन्स |
2011 | क्रिस गेल | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर |
2012 | सुनील नारायण | कोलकाता नाईट रायडर्स |
2013 | शेन वॉटसन | राजस्थान रॉयल्स |
2014 | ग्लेन मॅक्सवेल | किंग्ज इलेव्हन पंजाब |
2015 | आंद्रे रसेल | कोलकाता नाईट रायडर्स |
2016 | विराट कोहली | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर |
2017 | बेन स्टोक्स | राइजिंग पुणे सुपरगिजंट |
2018 | सुनील नारायण | कोलकाता नाईट रायडर्स |
2019 | आंद्रे रसेल | कोलकाता नाईट रायडर्स |
2020 | जोफ्रा आर्चर | राजस्थान रॉयल्स |
योगायोगाने, 2012 मध्ये विजेत्या संघाच्या खेळाडूला MVP पुरस्कार देण्यात आला होता. केकेआरने आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले तेव्हा सुनील नरेनने हा पुरस्कार जिंकला होता. मागील वर्षी, 2020 मध्ये जोफ्रा आर्चर MVP ठरला होता.