
IPL 2025 Date and Schedule: आयपीएल 2025 चे आयोजन 22 मार्चपासून केले जाऊ शकते. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ सामना करतील. आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. मिळालेल्या अहवालानुसार, 10 संघांची ही लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर 12 दिवसांनी आयोजित केली जाईल. ही स्पर्धा 12 ठिकाणी खेळवली जाईल, ज्यामध्ये 10 फ्रँचायझींचे होम ग्राउंड असतील, तर गुवाहाटी (आरआरसाठी दुसरे ठिकाण) आणि धर्मशाळा (पंजाब किंग्जसाठी दुसरे ठिकाण) ही इतर ठिकाणे असतील. आयपीएलने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
केकेआर आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीचा सामना
अहवालानुसार, उद्घाटन सामन्यात दोन संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळतील. आरसीबीने अलीकडेच रजत पाटीदार यांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे, तर केकेआरने अद्याप श्रेयस अय्यरचा उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही, ज्याने 2024 मध्ये त्यांना जेतेपदापर्यंत नेले होते. गेल्या वर्षी आरसीबी लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता. सहा विजय आणि त्यानंतर सलग सहा पराभवांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर, आरसीबीला एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 23 मार्च रोजी खेळला जाऊ शकतो
पंजाब किंग्जचे घरचे सामने धर्मशाळा आणि मुल्लानपूर येथे
श्रेयस आणि रिकी पॉन्टिंग यांच्या रूपात नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक असलेल्या पीबीकेएस संघाचे तीन होम मॅचेस धर्मशाळेत खेळतील, तर उर्वरित चार होम मॅचेस पंजाबमधील मुल्लानपूर येथे होतील.