IPL 2020 Update: 'PSL स्पर्धा पुढे ढकला', आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या आयोजनासाठी BCCI ची PCB कडे मागणी, वाचा सविस्तर
आयपीएल ट्रॉफी, पीएसएल लोगो (Photo Credit: PTI/Twitter)

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला पुढे ढकलल्या जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सीझन 13 च्या नव्या वेळापत्रकाचे काम करण्याची संधी मिळाली परंतु आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) आशिया चषक (Asia Cup) आणि पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) या वर्षी आयोजित करण्याच्या निर्णयाने पुन्हा एकदा अराजक परिस्थिती निर्माण केली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी बुधवारी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये श्रीलंका किंवा युएई येथे एशिया कप आणि नोव्हेंबरमध्ये उर्वरित पीएसएलचे (PCL) सामने आयोजित करण्याचाही बोर्ड विचार करीत असल्याचे सांगितले. संपूर्ण परिस्थिती मात्र बीसीसीआयसाठी (BCCI) समस्याप्रधान आहे. त्यामुळे, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलच्या 13 व्या सत्राचे आयोजन करण्यासाठी आता बीसीसीआयने पाकिस्तान बोर्डाकडे पीएसएल पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. (Asia Cup 2020: आशिया चषक होणारच! पूर्व निर्धारित वेळेनुसार श्रीलंका किंवा युएईमध्ये होणार स्पर्धा, अफवांवर PCB CEO वसीम खानचे स्पष्टीकरण)

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला, “आशिया चषकाचं आयोजन यंदा सुरळीत होईल याबद्दल साशंकता आहे. पाकिस्तान बोर्डाच्या सीईओ यांनी केलेल्या वक्तव्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत भारतीय संघाला ही स्पर्धा खेळणं जमणार नाही. कदाचीत त्यांनी पीएसएलचं आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवला तर योग्य होईल. नाहीतर सध्याच्या खडतर काळात आशिया चषकचं आयोजन करणं आणि सामने खेळणं शक्य नाही.”

दुसरीकडे, या विषयावर बोलताना वसीम खान म्हणाले होते की, बीसीसीआय आयपीएलच्या 13 व्या सत्रासाठी या विंडोकडे पाहत आहे हे मला माहित नाही म्हणूनच पीसीबी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे. ते म्हणाले, "आयपीएल कधी होणार आहे हे आम्हाला ठाऊक नाही, एकदा आम्हाला स्पष्टीकरण मिळाल्यानंतर आम्ही त्या भोवती काम करू शकतो, जोपर्यंत आम्हाला माहित आहे सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो अजूनही आशिया चषक स्पर्धेसाठी खुली आहे."