PC-X

IPL 2025 Point Table: आयपीएल 2025 (IPL 2025) चा पहिला रविवार सुपरहिट ठरला. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) च्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत 286 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने धावांचा पाठलाग केला पण 44 धावा कमी पडल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवला. सीएसकेने हा सामना 4 गडी राखून जिंकला. दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्येही बदल झाला आहे.

आयपीएल पॉइंट्स टेबल

सनरायझर्स हैदराबादने शानदार विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादने 2 गुण कमवत सर्वोत्तम नेट रन रेट राखला आहे. आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात केकेआरला हरवले. मुंबईला हरवून सीएसके तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. केकेआर राजस्थानपेक्षा फक्त एका पॉइंटनेवर आहे.