IPL 2022 Auction: पाकिस्तानचे ‘हे’ तडाखेबाज खेळाडू असते आयपीएल लिलावाचा भाग तर फ्रँचायझींमध्ये झाली असती जोरदार रस्सीखेच
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IPL Auction: आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी बेंगळुरू (Bangalore) येथे होणार आहे. विद्यमान आठ संघांनी त्यांच्या कायम आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावर्षी देश-विदेशातील 590 खेळाडू लिलावात उतरणार आहेत. गेल्या अनेक सीजनपासून पाकिस्तानी खेळाडूंना (Pakistan Cricketers) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) भाग घेण्याची परवानगी नाही. पाकिस्तानचे एकूण 11 खेळाडू आयपीएलच्या (IPL) उद्घाटनाच्या आवृत्तीत खेळले. मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढला आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना टी-20 लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली. पाकिस्तानमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत जे संधी मिळाल्यास आयपीएल करार मिळवू शकतात. अशा परिस्थितीत आयपीएलचा करार मिळवणारे पाच तडाखेबाज खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL Auction 2022: आयपीएल 15 होणार दमदार; 10 पैकी 7 संघांचे कर्णधारांच्या नावावर शिक्कामोर्तब, 3 फ्रँचायझी नवीन चेहऱ्यांच्या शोधात)

1. बाबर आजम (Babar Azam)

बाबर आजम जगातील सर्वात स्टायलिश क्रिकेटपटूंपैकी आहे. पाकिस्तानचा कर्णधार हा क्रमवारीत अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि शीर्षस्थानी स्थिरता शोधणारी आयपीएल फ्रँचायझींमध्ये त्याच्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली असतील तो परिस्थितीशी जुळवून खेळतो आणि पॉवर प्ले षटकात आक्रमक फलंदाजी करतो.

2. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)

पाकिस्तानचा सलामीवीर गेल्या दोन हंगामात देशातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. तो झटपट फलंदाजीत करतो आणि चेंडू वाया घालवत नाही. तो क्रमवारीत वरच्या स्थानावर स्थिर आहे आणि शीर्षस्थानी स्थिरता व आक्रमकता आणतो ज्याची आयपीएल फ्रँचायझींना सर्वाधिक गरज आहे.

3. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi)

टी-20 विश्वचषक स्पर्धेत शानदार खेळीने युवा आफ्रिदीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. नवीन चेंडूसह त्याच्या कौशल्यामुळे त्याला आयपीएल लिलावातही खूप चांगला भाव मिळाला असता. पॉवर-प्लेमध्ये विकेटक घेण्याची त्याची क्षमता व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये त्याला प्रभावी बनवते.

4. हरिस रौफ (Haris Rauf)

बिग बॅश लीगमध्ये त्याच्या गोलंदाजी कारनाम्यांमुळे हारिस रौफ प्रसिद्ध झाला. BBL आणि PSL मधील प्रभावी कामगिरीमुळे त्याला पाकिस्तान क्रिकेट संघात प्रवेश मिळाला. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये गेल्या वर्षभरात त्याने संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रौफची गती बदलण्याची क्षमता त्याला टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यास मदत केली. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये तो पाकिस्तानसाठी उत्कृष्ट ठरला.

5. शादाब खान (Shadab Khan)

लेग-स्पिन अष्टपैलू खेळाडू शादाब खान व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची विविधता खूपच प्रभावी ठरली आहे. खानने आयसीसी T20 विश्वचषकमध्ये एका षटकात फक्त 6 धावा दिल्या आणि त्याची 15.33 ची सरासरी त्याच्या स्पर्धेत सर्वोत्तम होती. गोलंदाजी व्यतिरिक्त शादाब खान डेथ ओव्हरमध्ये मोठे षटकार ठोकू शकतो आणि तो एक अपवादात्मक क्षेत्ररक्षक आहे. खेळातील त्याची अनेक कौशल्ये लक्षात घेऊन तो आयपीएल लिलावात मोठी बोली आकर्षित करू शकला असता.