IPL 2022 Teams: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 14वे सत्र यंदा 9 एप्रिलपासून सुरू होणार असून सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने-सामने येतील. पुढील वर्षी 2022 मध्ये आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये (IPL) भाग घेतील असे वृत्त समोर आले होते ज्याच्यासाठी बीसीसीआयने (BCCI) तयारी सुरु केली आहे. आयपीएलच्या 15व्या मोसमात 10 संघाचा समावेश करण्यासाठी बीसीसीआयने मे महिन्यात लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेतली. बीसीसीआयच्या एका अधिका्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था PTIला सांगितले की, “पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ असतील आणि यंदा मे महिन्यापर्यंत नव्या फ्रँचायझीची बोली प्रक्रिया आणि त्यासंबंधित विविध गोष्टी फायनल केल्या जातील.” ते म्हणाले, “संघांचा निर्णय घेतल्यानंतर ते आपले कामकाज सुरु करू शकतात, यासाठी बराच वेळ लागतो.” (IPL 2021 मध्ये होणार प्रेक्षकांची ‘एंट्री’? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला मोठा अपडेट)
सध्याच्या हंगामात एकूण 52 दिवस देशातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळले जातील. यावेळी एकूण 56 लीग सामने आणि प्ले ऑफ-फायनलचे असे चार सामने होणार आहेत. विशेष म्हणजे लीग स्टेजजे सर्व संघ केवळ चार ठिकाणी खेळले जाणार आहेत. यावेळी आयपीएल राजस्थान, पंजाब आणि हैदराबाद या ठिकाणी आयोजित केले जाणार नाही. सर्व सामने फक्त सहा शहरांमध्ये होणार आहेत असून यामध्ये चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलोर येथे प्रत्येकी दहा सामने होणार आहेत, तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी आठ सामने खेळले जातील. आयपीएल 2021 मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळू शकणार नाहीत, म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळणार नाही. सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील आणि कोणताही संघ त्यांच्या घरी सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ सहापैकी चार ठिकाणी सामने खेळतील.
या स्पर्धेत एकूण 11 डबल हेडर (दिवसाचे दोन बाउट्स) खेळले जातील. यामध्ये दुपारचा सामना 3:30 पासून सुरु होईल तर संध्याकाळचे सामने 7:30 वाजता सुरु होतील.