चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याच्यावर तब्बल 14 कोटी रुपये उधळले. तथापि, वेस्ट इंडिज विरोधात टी-20 मालिकेतील एका सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्याला संघातून बाहेर बसण्यासाठी भाग पडले. यामुळे आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वातील फ्रँचायझीला मोठा धक्का बसू शकतो, नुकत्याच झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चाहर आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. विंडीजविरुद्ध मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या T20 सामन्यात गोलंदाजी करताना चाहरला दुखापत झाली. अशा परिस्थितीत चार वेळा आयपीएल चॅम्पियन्स फ्रँचायझी 29 वर्षीय गोलंदाजाला रिप्लेस करू शकतील असे खेळाडू खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 Mega Auction: ‘त्याने एक रुपयाही घेतला नसता’! CSK ने 14 कोटींमध्ये खरेदी केलेल्या सुपरस्टार खेळाडूकडून MS Dhoni चे तोंडभरून कौतुक)
1. इशांत शर्मा
CSK अशा फ्रँचायझींपैकी एक आहे ज्यांनी या सर्व वर्षांमध्ये खेळ आणि स्पर्धा जिंकण्यासाठी अनुभवाचा आधार घेतला आहे. त्यामुळे इशांत शर्मा चाहरच्या जागी योग्य पर्याय ठरू शकतो. शर्मा यापूर्वी आयपीएलमध्ये खेळला आहे आणि त्याला टी-20 क्रिकेटची चांगली समज आहे. तसेच इशांतबरोबर बराच वेळ खेळल्यामुळे, एमएस धोनीला गोलंदाज कसा खेळ करू शकतो याची चांगली जाणीव आहे ज्यामुळे तो शेवटच्या क्षणी बदली पर्याय म्हणून इशांत एक आदर्श पर्याय बनतो.
2. संदीप वारियर
वॉरियरने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी टी-20 पदार्पण केले. तर 2018-19 विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो केरळचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता आणि त्याने 2019 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट हॅटट्रिक देखील घेतली होती आणि आपली प्रतिभा दाखवली होती. 30 वर्षीय खेळाडू खेळपट्टीवर चांगली उसळी घेऊ शकतो आणि CSK च्या गोलंदाजी सेटअपमध्ये एक परिपूर्ण खेळाडू ठरू शकतो. याशिवाय ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित केली जात आहे जेथे खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानल्या जातात.
3. अरझान नागवासवाला
24 वर्षीय अरझान नागवासवाला अलीकडच्या काळात राष्ट्रीय निवडकर्त्याच्या रडारवर आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने नागवासवाला CSK च्या गोलंदाजी पर्यायांना वेगळे वळण आणू शकतो. फ्रँचायझीकडे यापूर्वी सॅम कुरन डावखुरा वेगवान गोलंदाज होता, त्यामुळे ती या युवा भारतीय गोलंदाजाला अशाच प्रकारची भूमिका बजावण्यासाठी एक संधी देऊ शकते.नागवासवालाने 2018 मध्ये गुजरातसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चांगली ओळख निर्माण केली आहे.