
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी शनिवारी सांगितले की आयपीएल (IPL) 2022 चे प्ले-ऑफ आणि फायनल कोलकाता व अहमदाबाद येथे खेळले जाणार आहेत. याशिवाय भारताच्या माजी कर्णधाराने महिला T20 चॅलेंज - 3 सांघिक टी-20 स्पर्धेची तारीख आणि ठिकाणांची देखील घोषणा केली. पहिला प्ले-ऑफ आणि एलिमिनेटर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर, तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याची गांगुलीने देखील पुष्टी केली. तसेच प्रेक्षकांसाठी मोठी बातमी म्हणजे बोर्डचे प्रमुख म्हणाले की, सर्व 4 सामने 100 टक्के क्षमतेच्या प्रेक्षकांसह खेळले जातील. आयपीएल 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे तर तीन प्ले-ऑफ सामने 24, 26 आणि 27 मार्च रोजी होणार आहेत. (IPL 2022: रवी शास्त्री यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले - IPL ला मिळणार नवा चॅम्पियन; RCB च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर केले मोठे विधान)
“महिला चॅलेंजर (Women's Challengers) मालिका 24 ते 28 मे दरम्यान लखनौच्या (Lucknow) एकना स्टेडियमवर होणार आहे,” बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष गांगुली यांनी PTI च्या हवाल्याने मीडियाला सांगितले. “पुरुषांच्या आयपीएल बाद फेरीतील (IPL Playoffs) सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित केले जातील, 22 मे रोजी लीग संपल्यानंतर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीची परवानगी दिली जाईल,” गांगुली पुढे म्हणाले. यावेळी आयपीएलमध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. साखळी टप्प्यात सर्व संघांना 14 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर लीग स्टेजच्या अखेरीस सर्वाधिक गुण असलेले 4 संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. यानंतर चार संघांमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाले. तर उर्वरित सहा संघांचा आयपीएलमधील प्रवास तिथेच संपुष्टात येईल. पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन संधी असतील, तर तिसऱ्या व चौथ्या संघांना पहिला एलिमिनेटर सामना जिंकून आंखणी दुसरा प्लेऑफ सामना खेळायचा आहे. यावेळी सर्वच संघ आपला पूर्ण जोर लावत असून, यावेळी जुना संघ चॅम्पियन होतो की नवा चॅम्पियन होतो हे पाहावे लागेल.
कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे लीग सामने फक्त महाराष्ट्राच्या चार स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहेत. सर्व साखळी सामने मुंबईतील तीन मैदानात आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार आहेत. सर्व संघ बायो-बबलमध्ये खेळत आहेत. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि दोन खेळाडूंसह एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एक सदस्यही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.