हार्दिक पांड्या आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2022 PlayOffs: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यानंतर प्लेऑफ फेरी गाठणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore_ चौथा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या विजयासह दिल्लीचा प्रवासाला ब्रेक लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 5 चेंडू राखून धावसंख्या गाठली. एकेकाळी मुंबई हा सामना हरणार असे वाटत होते, पण त्यानंतर टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. 22 मे रोजी आयपीएलचा (IPL) अंतिम सामना खेळला जाणार आणि त्यानंतर क्वालिफायर सामने 24 मे पासून सुरू होणार आहेत आणि लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. चला तर मग प्लेऑफ सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या... (IPL 2022, MI vs DC: अखेर शेवट गोड करताना मुंबईचा 5 विकेट्सने दिमाखदार विजय, दिल्ली कॅपिटल्सचा गाशा गुंडाळला; RCB च्या झोळीत प्लेऑफचे तिकीट)

क्वालिफायर 1 सामना

आयपीएल 2022 मध्ये क्वालिफायरचा पहिला सामना 24 मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाईल. यातील विजयी संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल.

एलिमिनेटर सामना

यानंतर, 25 मे 2022 रोजी लखनऊ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स/रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होईल. या सामन्यात पराभूत संघ बाहेर पडेल, तर विजयी संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी, क्वालिफायर 2, आणखी एक सामना खेळावा लागणार आहे.

क्वालिफायर-2 सामना

27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ आणि पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. या सामन्यात जो संघ जिंकेल तो फायनल सामना खेळेल.

अंतिम सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचा अंतिम सामना रविवार, 29 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. अंतिम सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. यावेळी अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स परफॉर्म करणार आहेत. हा सोहळा सुमारे 50 मिनिटे चालणार असून यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.