रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत, परंतु बुधवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार आयपीएल (IPL) 2022 पर्पल कॅप धारक उमेश यादव याच्या चेंडूवर स्विंग शॉट खेळला आणि यष्टिरक्षक सॅम बिलिंग्स याच्या हाती झेलबाद होऊन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. शर्माने आयपीएल 2022 ची दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अर्धशतकासह चांगली सुरुवात केली परंतु आता दोन सामन्यांत तो पुढे जाण्यात अयशस्वी ठरला आहे. KKR विरुद्ध 3 धावांवर बाद होण्यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध देखील फ्लॉप ठरला. जगातील लहान फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक गेल्या दोन्ही सामन्यात रोहित सावध दिसला आणि उमेश व केकेआरचा (KKR) नवोदित रसिक सलाम यांच्या विरुद्ध तो अस्वस्थ दिसला. उउमेशने त्याच्या दुसऱ्या षटकात रोहितला बाद केले. (IPL 2022 MI vs KKR Match 14: डेवाल्ड ब्रेविस याची जोरदार सुरुवात, पदार्पण सामन्यात खेचला शानदार ‘नो लूक सिक्स’; पहा व्हिडिओ)

रोहितने आत्तापर्यंत IPL मध्ये KKR विरुद्ध 1018 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. दरम्यान, रोहित टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा सर करण्यापासून आता 53 धावा दूर आहे. त्याचा माजी कर्णधार विराट कोहली टी-20 मध्ये यापूर्वीच 10,000 धावांचा टप्पा ओलांडणार पहिला भारतीय खेळाडू आहे. दरम्यान कोलकाताविरुद्ध नाणेफेकीच्या वेळी MI ने दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि किरॉन पोलार्ड सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी जबाबदारी घेण्याचे रोहित शर्माने कबूल केले. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ईशान किशनसोबत फलंदाजीला आल्यानंतर रोहित आजच्या संपूर्ण सामन्यतः अस्वस्थ दिसत होता.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्याबद्दल बोलायचे तर बुधवारी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा अंडर-19 स्टार डेवाल्ड ब्रेविस याला पदार्पणाची संधी दिली, तर बोटाच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर सूर्यकुमार यादव देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला. दरम्यान, केकेआरमध्ये पॅट कमिन्स याचे पुनरागमन झाले आणि रसीख सलीम याने फ्रँचायझीकडून पदार्पण केले.