IPL 2022, RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) विरुद्धच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ वेगळ्या रूपात दिसणार आहे. या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबी संघ हिरवी जर्सी (RCB Green Jersey) घालून मैदानात उतरणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा संघ ‘गो ग्रीन’ उपक्रमांतर्गत ही जर्सी घालणार आहे. तथापि हिरवी जर्सी आरसीबी (RCB) संघासाठी लकी आहे की अनलकी? हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. गेल्या चार वर्षात आरसीबी संघाने हिरव्या जर्सीत एकही सामना जिंकलेला नाही. 2011 मध्ये RCB संघ पहिल्यांदा हिरवी जर्सी घालून खेळला होता. आयपीएल 2022 मध्ये हैदराबादविरुद्ध सामन्यापूर्वी आरसीबीने त्यांची नवीन हिरवी जर्सीचे अनावरण केले. हिरवी जर्सी परिधान करून RCB संघ संपूर्ण जगाला पर्यावरणाची काळजी घ्या आणि जगभरात हिरवाई आणा असा संदेश देऊ इच्छितो. (IPL 2022: प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेली जर्सी घालून RCB पुढील सामन्यात खेळणार, सनरायझर्स हैदराबाद होणार टक्कर)
आता हिरव्या जर्सीत आरसीबीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यंत, आरसीबी संघाने हिरव्या जर्सीत एकूण 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघ केवळ दोन सामने जिंकू शकला आहे. उर्वरित आठपैकी सात सामन्यांमध्ये आरसीबीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. लक्षणीय आहे की 2011 ते 2020 पर्यंत RCB संघ हिरव्या जर्सीमध्ये सामना खेळला तर 2021 मध्ये संघाने निळी जर्सी परिधान केली होती. 2021 मध्ये RCB ने कोविड वॉरियर्ससाठी निळ्या रंगाची जर्सी घालून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी RCB ने कोविड महामारीविरुद्धच्या युद्धात आघाडीवर असलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ निळी जर्सी परिधान केली होती. दरम्यान, चालू हंगामातील आरसीबीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर संघाने 11 पैकी सहा सामने जिंकले आहेत, तर पाच सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आरसीबीच्या हिरव्या जर्सीचा इतिहास काही खास राहिला नाही. या जर्सीत संघने 9 सामने खेळले आणि फक्त दोन वेळा जिंकले आहेत. पहिला विजय त्यांनी 2011 मध्ये कोची टस्कर्सविरुद्ध तर दुसरा विजय 2016 मध्ये गुजरात लायन्स या नवीन संघाविरुद्ध मिळाला होता. गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने शानदार खेळी केली आणि आरसीबीने 248 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात विराट कोहली ने 109 आणि एबी डिव्हिलियर्सने 129 धावांची विस्फोटक खेळी केली होती.