जोस बटलर, केएल राहुल (Photo Credit: PTI)

Fastest Hundred in IPL 2022: आयपीएल (IPL) 15 मध्ये आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहेत. मात्र, त्यानंतरही इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. हे दोन्ही फलंदाज या मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. या मोसमात आतापर्यंत पाच शतके झाली आहेत, ज्यामध्ये बटलरच्या नावावर तीन शतके आहेत. त्याचबरोबर राहुलने दोन शतके झळकावली आहेत. तथापि या दोघांमध्ये या मोसमातील सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने केले माहित आहे? (IPL 2022: कारखान्यात रात्रभर काम करायचा, 10 रुपये वाचवण्यासाठी मैल चालायचा; वाचा मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी)

या मोसमात आतापर्यंत 5 शतके केली आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने तीन शतके झळकावली आहेत. याशिवाय राहुलच्या बॅटमधून दोन शतके झळकली आहेत. बटलरने मुंबईविरुद्ध 66 चेंडूत पहिले शतक केले. त्याने KKR विरुद्ध 59 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली होती. याशिवाय दिल्लीविरुद्ध 57 चेंडूत 116 धावा केल्या. दुसरीकडे, राहुलबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध या मोसमातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. हंगामातील मुंबईविरुद्ध पहिला सामना खेळत राहुने अवघ्या 56 चेंडूत 103 धावा केल्या होत्या. याशिवाय राहुलने मुंबईविरुद्ध दुसरे शतकही ठोकले. यादरम्यान त्याने 61 चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. या हंगामात बटलरने दोन सलग शतके केली तर, राहुलने दोन शतके झळकावली आहेत आणि दोन्ही वेळी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी पल्ला गाठला आहे. राहुलला मुंबई इंडियन्सची विशेष आवड आहे. त्याने आयपीएल 2022 मध्ये त्याचे दोन्ही शतके मुंबई संघाविरुद्ध झळकावली आहेत.

दुसरीकडे, या मोसमात बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या मोसमात त्याने 65.33 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर केएल राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने या मोसमात 56.37 च्या सरासरीने 451 धावा केल्या आहेत. लक्षणीय आहे की बटलर आणि राहुल सध्या आयपीएलच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दोन्ही खेळाडू आपापले फ्रँचायझी- राजस्थान आणि लखनौच्या, हंगामातील सर्वोत्तम कामगिरीमागील महत्वाचे कारण आहेत.