IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारे केवळ दोनच खेळाडू आपल्या टिमला  ठरवू शकले 'नायक', सध्या दोघेही CSK च्या ताफ्यात
रुतुराज गायकवाड (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022: आयपीएलचा 15वा सीझन आता आपल्या अंतिम वळणावर उभा आहे. यावेळी 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसणार असल्याने या लीगची उत्सुकता आणखीनच आहे वाढली आहे. आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये 60 सामने खेळले गेले आहेत. आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ - मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) - प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तसेच यावर्षी आयपीएल पदार्पण केलेला गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही लीगमध्ये फलंदाज मोठे फटके मारताना दिसत आहेत. अशा स्थितीत ऑरेंज कॅपसाठी (IPL Orange Cap) खेळाडूंमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या (IPL) इतिहासात असे फक्त दोनदा घडले आहे जेव्हा विजेत्या संघाच्या फलंदाजाने ऑरेंज कॅप जिंकली आहे. या हंगामात दोन्ही फलंदाज सीएसकेचा (CSK) भाग आहेत. (IPL 2022 Orange Cap Updated List: जोस बटलर 625 धावांसह आघाडीवर, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सलामी फलंदाजांचे वर्चस्व)

आयपीएलमध्ये एकूण 11 खेळाडूंच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. यापैकी दिग्गज ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरने सर्वाधिक तीन वेळा हा मान मिळवला आहे. गेल्या वर्षी चेन्नईच्या विजयी मोहिमेत ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅपचा ताबा मिळवला होता. 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला फलंदाज रॉबिन उथप्पाने 44 च्या सरासरीने सर्वाधिक 660 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या 7 व्या मोसमात नाईट रायडर्सने अंतिम फेरीत किंग्स इलेव्हन पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती केली आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकून आपल्या, CSK संघाला चॅम्पियन बनवले. आयपीएलच्या 14 व्या हंगामात गायकवाडने 45.35 च्या सरासरीने सर्वाधिक 635 ​​धावा केल्या. यादरम्यान CSK ने अंतिम फेरीत KKR चा 27 धावांनी पराभव केला होता.

दुसरीकडे, सध्याच्या आयपीएल ऑरेंज कॅपबद्दल बोलायचे तर यंदाच्या ऑरेंज कॅपच्या यादीत जोस बटलर 625 धावांसह आघाडीवर आहे. 15 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत केएल राहुल 459 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर वॉर्नर तिसऱ्या स्थानावर असून त्याने 10 सामन्यात 61 च्या सरासरीने 427 धावा केल्या आहेत.