IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबईच्या ‘पलटन’चा सलग दुसरा पराभव; चहलची फिरकी, बटलरच्या वादळी खेळीमुळे राजस्थानची सामन्यात बाजी
राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match 9: इंडियन्स प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या पदरी अपयशी निराशा आली. मुंबई निर्धारित षटकांत 7 विकेट गमावून धावाच करू शकले. परिणामी राजस्थानने 23 रन्सने दणदणीत विजय मिळवला. संघाचा तडाखेबाज अष्टपैलू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) अखेरच्या बॉलवर 22 धावा करून बाद झाला. मुंबईकडून तिलक वर्मा (Tilak Varma) याने सार्वधिक 61 धावा केल्या तर ईशान किशनने (Ishan Kishan) 54 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीने निराश केलेल्या मुंबईच्या अपेक्षा पूर्ण करण्यास फलंदाज देखील फेल ठरले. दुसरीकडे, राजस्थानच्या विजयात फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आणि गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मुख्य नायक ठरले. (IPL 2022, MI vs RR Match 9: Joss Buttler ने ठोकला 101 मीटर लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर पडला Watch Video)

राजस्थानने दिलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 10 तर अनमोलप्रीत सिंह फक्त 5 धावा करून माघारी परतले. त्यानंतर किशन आणि वर्माने मोर्चा हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच घाम फोडला. दोंघांनी 81 धावांची भागीदारी करून संघाला आणखी एक झटका बसू न देण्याची खात्री केली. यादरम्यान ईशानने आणि तिलक यांनी अर्धशतकी पल्ला गाठला. पण दोघे अर्धशतकाच्या मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरले. 54 धावांची शानदार खेळी करून ईशानला बोल्टने पॅव्हिलियनची वाट दाखवली, तर रविचंद्रन अश्विनने वैयक्तिक 61 धावांवर तिलक वर्माला बाद करून मुंबई इंडियन्सला चौथा धक्का दिला. यानंतर पोलार्ड एक बाजू धरून असताना चहलने टिम डेविड आणि डॅनियल सॅम्स याला साग दोन चेंडूत खाते न उघडता माघारी धाडले. दुसरीकडे, राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर  ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यापूर्वी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या पाच विकेट शेवटच्या दोन षटकांत पडल्या. 20व्या षटकात आलेल्या टायटल मिल्सने नवदीप सैनीला 2 धावांवर धावबाद केले, तर रियान पराग डावाच्या शेवटच्या चेंडूवर 5 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 193 धावांपर्यंत मजल मारली. जोस बटलरने सर्वाधिक 100 धावा केल्या.