IPL 2022 Mega Auction: दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ धुरंदर ओपनर साठी फ्रँचायझींमध्ये होऊ शकते रस्सी-खेच, पाण्यासारखा पैसा खर्च उधळतील
क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 15 व्या सीजनसाठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. आयपीएलच्या लिलावासाठी (IPL Aucton) यावर्षी तब्ब्ल 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे त्यापैकी अंतिम यादी तयार केली जाईल, त्यापैकी 896 भारतीय आणि 318 परदेशी आहेत. यापूर्वी देशी तसेच विदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर फ्रँचायझींचे बारीक लक्ष असेल. टीम इंडियाच्या नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर वनडे मालिकेत तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. पण दक्षिण आफ्रिका संघातील अनेक खेळाडूंनी यादरम्यान प्रभावी कामगिरी केली. आणि यामध्ये Proteas सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आघाडीवर आहे. आणि त्याच्यावर लिलावात मोठी बोली लागली तर आश्चर्य वाटणार नाही. रविवारी डी कॉकच्या शतकी खेळी निर्णायक ठरू शकते. (IPL 2022 Auction Players Base Price: ‘या’ भारतीय 17 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी, लिलावात आजमावणार नशीब)

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने 124 धावा केल्या. तर तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 229 धावा केल्या. डी कॉकला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. क्विंटन डी कॉक आयपीएल 2022 च्या लिलावात सर्वात महागडा सलामीवीर बनू शकतो. विदेशी सलामीवीरांमध्ये डी कॉकवर फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा उधळू शकतात. मात्र डी कॉकला या यादीत डेविड वॉर्नर, आरोन फिंच, जॉनी बेअरस्टो सारख्या दिग्गजांकडून कडू टक्कर मिळू शकते. डी कॉकने आतापर्यंत आयपीएलच्या 77 सामन्यात एकूण 2256 धावा चोपल्या आहेत. त्याच्या आक्रमक आणि फटाफट खेळीमुळे तो अनेक फ्रँचायझींच्या रडारवर असेल.

डी कॉक 2019 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. 2019 आणि 2020 मध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई इंडियन्सने त्याला लिलावापूर्वी रिलीज केलेलं असले तरी यावेळी लिलावात ते डी कॉकवर बोली लावू शकतात. सेंच्युरियन येथील भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव झाल्यानंतर डी कॉकने गेल्या महिन्यात कसोटी निवृत्तीची धक्कादायक घोषणा केली होती. यानंतर पहिल्या  वनडे सामन्यात फ्लॉप ठरल्यावर त्याने दुसऱ्या सामन्यात 79 आणि तिसऱ्या वनडेत शतकी खेळीने सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले.