IPL 2022 Mega Auction Date & Venue: आयपीएल मेगा लिलावाची तारीख आली समोर, जाणून घ्या कधी आणि कुठे लागणार खेळाडूंवर बोली
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने (IPL Governing Council) यंदा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी मेगा लिलावाच्या तारखांवर आयपीएलचे (IPL) अध्यक्ष ब्रजेश पटेल यांच्याशी चर्चा केली आणि 12 व 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित केले जाईल याची पुष्टी केली. याशिवाय लीगच्या अध्यक्षांनी टाटा समूह चिनी मोबाइल निर्माता, विवोची (VIVO) 2022 पासून आयपीएलचे (IPL) टायटल स्पॉन्सर म्हणून जागा घेणार असल्याची देखील पुष्टी केली आहे. या वर्षीपासून लीगमध्ये एकूण 10 संघ जेतेपदासाठी दम लावतील. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ 2022 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सामील होतील. RPSG समुहाने तब्बल 7,090 कोटी रुपयांच्या बोलीनंतर लखनौ फ्रँचायझीचे हक्क जिंकले आणि CVC कॅपिटलने अहमदाबादसाठी 5,625 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. (IPL अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची घोषणा, VIVO ऐवजी TATA असणार आयपीएल 2022 चे टायटल स्पॉन्सर)

दरम्यान फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी दोन्ही संघांनी आपापल्या संघात 3 खेळाडूंचा द्राफ्ट तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. 8 विद्यमान फ्रँचायझींपैकी प्रत्येकाने गेल्या वर्षी प्रत्येकी जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन केले, तर दोन नवीन संघांना आता उर्वरित खेळाडूंच्या गटातून प्रत्येकी तीन खेळाडूंची निवडण्याची परवानगी आहे. यावेळी सामन्यांची संख्याही वाढणार असून 60 ऐवजी 74 सामने खेळवले जातील. तसेच टाटा समूह 2022 च्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीगचे टायटल स्पॉन्सरशिप ताब्यात घेईल असे लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर सांगितले. “होय, टाटा समूह आयपीएलचे शीर्षक प्रायोजक म्हणून येत आहे,” आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले. 2020 मध्ये भारत आणि चीनमधील सीमा विवादानंतर चीनी मोबाईल कंपनीबाबत विरोध सुरू झाला. ज्यानंतर वर्षभरासाठी बाहेर राहिल्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा एकदा विवोने आयपीएलमध्ये पुनरागमन केले.

दुसरीकडे, लिलावाबात बोलायचे तर सर्व राज्यातून खेळाडूंची यादी मागवण्यात आली आहे. तब्ब्ल 1000 खेळाडूंपैकी 250 खेळाडू निवडले जातील. अलीकडेच 8 संघांनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर लखनऊमध्ये दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. तर अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतो.