IPL 2022: जड्डूच्या CSK ने खेळला मोठा डाव, खतरनाक यॉर्कर टाकण्यात पटाईत ‘ज्युनियर Malinga’ला केले करारबद्ध; श्रीलंका अंडर-19 मध्ये केली कमाल कामगिरी
मथीशा पथिराना (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने (Adam Milne) याच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) फ्रँचायझीने श्रीलंकेचा युवा खेळाडू मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) याला करारबद्ध केले आहे. मिल्नेला CSK च्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आता उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 19 वर्षीय पाथिराना 2020 आणि 2022 मध्ये श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा भाग होता. चेन्नईने 20 लाख खर्चून त्याचा संघात समावेश केला आहे. पाथिराना हा वेगवान गोलंदाजच नाही तर उपयुक्त फलंदाजही आहे. आपल्या छोट्या कारकिर्दीत त्याने बॅटनेही छाप पाडली आहे. मात्र वाईड बॉलवर लगाम घालणे त्याच्यासाठी आव्हान असेल. अंडर-19 आशिया चषक (U19 Asia Cup) स्पर्धेत त्याने श्रीलंका संघाकडून शानदार खेळ केला, पण वाईड चेंडूवर लगाम घालू शकला नाही. (IPL 2022: मुंबईविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK संघात मोठा बदल, जखमी ऍडम मिल्नेच्या ‘या’ श्रीलंकन खेळाडूचा केला समावेश)

वेस्ट इंडिजमध्ये 2022 डर 19 विश्वचषक स्पर्धेत पाथीराना श्रीलंकेच्या संघाचा सदस्य होता. या स्पर्धेत त्याने 27.28 च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.16 होता. लक्षणीय आहे की पाथीराना देखील श्रीलंकाई दिग्गज लसिथ मलिंगा प्रमाणे वेगवान आणि अचूक यॉर्कर टाकण्यात पटाईत आहे. तो फक्त एकच लिस्ट ए सामना खेळला आहे आणि त्याने आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले आहेत, परंतु तो चेन्नईच्या संघाशी बराच काळ जोडला गेला आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2021 आधी चेन्नईने महेश तीक्षणा सोबत पाथीरानाला देखील राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जोडले होते. मिस्ट्री स्पिनर महिश थेक्षाना चेन्नईने इंडियन प्रीमियर 2022 मेगा लिलावात 70 लाखांत विकत घेतले. तो आता चेन्नईच्या संघाचा भाग बनला आहे आणि पॉवरप्लेमध्ये महत्त्वाच्या विकेट घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

ज्युनियर मलिंगा

दरम्यान दुष्मंथा चमीरा, भानुका राजपक्षे आणि वानिंदू हसरंगा यांच्यासह श्रीलंकेचे खेळाडू आयपीएल 2022 मध्ये प्रभाव पाडत आहेत. आणि आता यामध्ये मथीशा पाथिराना देखील सामील होईल. 2019 मध्ये त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची मलिंगासारखी शैली आहे. तो वेगवान, लेट-टेलिंग यॉर्कर्स देखील काढू शकतो या वस्तुस्थितीमुळे तो आणखी प्रकाशझोतात आला.