IPL 2022, DC vs KKR: कोलकाताला डबल दणका; दिल्लीच्या अष्टपैलू खेळीने नाईट रायडर्सना पराभवाचा सलग पाचवा धक्का, प्लेऑफची शर्यत रंगतदार स्थितीत
दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) सलग पाचव्या पराभवाचा दणका देत दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपली गाडी पुन्हा रुळावर आणली आणि 4 विकेटने विजयाची नोंद केली. केकेआरने (KKR) प्रथम फलंदाजीकडून दिल्लीसमोर अवघे 147 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 19 षटकांत लक्ष्य गाठले आणि विजयाची नोंद केली. तर कोलकात्याला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह आत आयपीएलच्या प्लेऑफची शर्यत (IPL Playoffs Race) आणखी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. दिल्लीने या विजयासह पंजाबला धक्का देत सहाव्या क्रमांकावर उडी मारली. दिल्लीचा आठव्या सामन्यातील हा चौथा विजय तर कोलकाताचा नवव्या सामन्यात सहावा पराभव ठरला आहे. अशा परिस्थितीत आता केकेआरचा प्लेऑफचा मार्ग आणखी खडतर बनला आहे. (IPL 2022, DC vs KKR: आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा Sunil Narine पहिला परदेशी फिरकीपटू, आतापर्यंत 8 गोलंदाजांनी केलीय ‘ही’ कामगिरी)

दिल्लीच्या विजयात कुलदीप यादव आणि मुस्तफिजूर रहमान यांनी बॉलने कोलकात्याला छोट्या धावसंख्येवर रोखले. तर डेविड वॉर्नर, अक्षर पटेल आणि रोवमन पॉवेल यांनी बॅटने संघाच्या झोळीत विजय पाडला. वॉर्नरने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर पॉवेल नाबाद 33 आणि अक्षर पटेलने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, फलंदाजांच्या फ्लोप शो नंतर गोलंदाजांनी संघाला विजयाच्या जवळ नेले मात्र, अखेरीस त्याच्या पदरी देखी अपयश आले. उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर सुनील नारायण हर्षदीप राणाने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना कोलकात्याच्या गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला पण विजयाचे लक्ष्य छोटे असल्यामुळे अखेरीस ऋषभ पंतच्या संघाने बाजी मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांची झटपट विकेट गमावली. पण वॉर्नरने ललितच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव हाताळला. वॉर्नर, ललित आणि पंतला बाद करून केकेआरने सामन्यात पुनरागमन केले. संघ विजयाच्या जवळ असताना अक्षर पटेलही माघारी परतला. अखेरीस पॉवेल आणि शार्दूल ठाकूरने संघाला विजयरेष ओलांडून दिली.

यापूर्वी केकेआरकडून नितीश राणाने 57 धावा केल्या. दिल्लीसाठी कुलदीप यादवने तीन षटकांत 14 धावांत चार बळी घेतले, तर मुस्तफिझूर रहमानने चार षटकांत 18 धावांत तीन बळी घेतले. कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले. आरोन फिंच 3, वेंकटेश अय्यर 6, बाबा इंद्रजित 6 आणि नारायण खाते न उघडता बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर 42 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तर आंद्रे रसेल खातेही उघडू शकला नाही.