IPL 2022, CSK vs RCB: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला आयपीएलच्या (IPL) 49 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कडून पराभवा सामना करावा लागला आहे. बेंगलोरने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सीएसके (CSK) निर्धारित 20 षटकांत 8 विकेट गमावून 168 धावाच करू शकला, परिणामी सीएसकेला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. यासह धोनीच्या नेतृत्वातील सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या अशा संपुष्टात आल्या आहेत. चेन्नई आयपीएल प्लेऑफ (IPL Playoffs) न खेळण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2020 मध्ये असेच घडले होते. चेन्नईचा 10 सामन्यातील हा 7 पराभव ठरला आहे तर आपल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने (RCB) अंतिम 4 च्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. (IPL 2022: ‘अरे आयपीएल चॅम्पियन...’, ट्रॉफी न जिंकण्यावर Virat Kohli उघडपणे समोर; लिलावात उतरण्याचीही मिळाली होती ऑफर, पण यामुळे RCB ची साथ नाही सोडली)
आयपीएलच्या 49 व्या सामन्यातील विजयासाठी RCB ने प्लेऑफची आस पल्लवित ठेवली आणि पॉईंट टेबलच्या अंतिम 4 मध्ये एन्ट्री घेतली आहे.174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज आणि कॉन्वेच्या जोडीने पुन्हा एकदा संघाला जोरदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना गायकवाडने आपली विकेट गमावली. रॉबिन उथप्पा एकच धाव करू शकला तर रायुडू 10 धावा करून झटपट बाद झाला. कॉन्वेने शानदार अर्धशतक ठोकले. मात्र, 56 धावा करून तो देखील पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा पुन्हा बॅटने योगदान देण्यात अपयशी ठरला आणि अवघ्या 5 धावा करून माघारी परतला. मोईन अलीने 34 धावा केल्या. चेन्नईसाठी डेव्हन कॉन्वेने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तथापि फलंदाजांच्या निराशजनक कामगिरीने चेन्नईला प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील बेंगलोरच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर गेलन मॅक्सवेलने दोन गडी बाद केले. तसेच शाहबाझ अहमद, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.
दुसरीकडे, टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या आरसीबी संघासाठी फाफ डु प्लेसिस (38) आणि विराट कोहली (30) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भर घातली, पण त्यानंतर चेन्नईकडून फिरकीपटूंनी जोरदार पुनरागमन केले. महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 धावा केल्या. तसेच रजत पाटीदारने 21 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 26 धावा करत संघाला 173 धावसंख्येपर्यंत नेले. चेन्नईकडून मोईन अलीने दोन आणि महेश तीक्षणाने तीन गडी बाद केले.