IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएलच्या (IPL) आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Kight Riders) 6 विकेटने दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या 132 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 18.3 षटकांत जोरदार विजय मिळवला. कोलकाताच्या विजयात उमेश यादव, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी महत्वाची भूमिका बजावली. उमेशने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर रहाणेने 44 धावांची दमदार खेळी केली. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर 20 धावा करून नाबाद परतला तर सॅम बिलिंग्सने 25 आणि वेंकटेश अय्यर याने 16 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, चेन्नईसाठी ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) 3 आणि मिचेल सँटनरने 1 विकेट घेतली. या विजयासह केकेआरने दोन गुण मिळवले आहेत. (IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावो याची आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमाची केली बरोबरी, सॅम बिलिंग्ज याला बाद करून रचला इतिहास)
दरम्यान, नाणेफेक गमावल्यावर बॅटने चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (0) आणि डेव्हन कॉन्वे (3) धावाच करू शकले. त्यानंतर 21 मध्ये 28 धावा करून रॉबिन उथप्पा बाद झाला. तर अंबाती रायुडू धावा घेण्याच्या गोंधळात 15 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तसेच अष्टपैलू शिवम दुबे 3 फक्त धावाच करू शकला. त्यानंतर एमएस धोनी आणि कर्णधार रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 56 चेंडूत 70 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. धोनीने 38 चेंडूत 50 धावांचे नाबाद योगदान दिले. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर जडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.
प्रत्युत्तरात 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सकडून वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या सलामी जोडी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. रहाणे एकीकडे आक्रमक फटके खेळत असताना अय्यर संथ फलंदाजी करताना दिसला. अय्यरने 16 धावा केल्या तर नितीश राणाने 21 धावा केल्या. तसेच कोलकाताच्या विजयात रहाणेने 44 धावांची सर्वाधिक खेळी केली. यादरम्यान चेन्नईचा घातक वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावो याने सॅम बिलिंग्स याला बाद करून आयपीएलच्या सर्वात मोठ्या विक्रम लसिथ मलिंगा याची बरोबरी केली. मलिंगासोबत ब्रावोच्या नावे आता आयपीएलमध्ये सर्वाधिक 170 विकेट्सची नोंद झाली आहे.