बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मेगा लिलावापूर्वी, अहमदाबाद फ्रँचायझीचा (Ahmedabad Franchise) कर्णधार आणि भारतीय संघाचा (Indian Team) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 28 वर्षीय खेळाडूच्या कारकिर्दीत एमएस धोनीने (MS Dhoni) कशी महत्त्वाची भूमिका बजावली हे उघड केले. अष्टपैलू म्हणून पुनरागमन करताना त्याला धोनीच्या शैलीचे अनुसरण करायला आवडेल असे त्याने आपल्या पहिल्या कर्णधारपदाच्या प्रवासात सांगितले. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी अष्टपैलू खेळाडूसाठी गेले काही महिने त्याचा फॉर्म आणि फिटनेसच्या प्रश्नांमुळे कठीण ठरला आहे. सततच्या पाठीच्या समस्येमुळे आयपीएलच्या (IPL) मागील दोन मोसमात गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकने त्याच्या फिटनेसबाबत अपडेट देत सांगितले की, त्याला अष्टपैलू म्हणून पुनरागमन करण्याचा विश्वास आहे आणि त्याची सर्व तयारी, नियोजन हे लक्षात घेऊनच केले जात आहे. गुजरातचा हार्दिक लीगमध्ये प्रथमच कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. (Ahmedabad IPL 2022 Team: यावर्षी आयपीलमध्ये अहमदाबाद संघ करणार पदार्पण, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित)
बोरियासोबत बॅकस्टेजवर बोलताना हार्दिक म्हणाला, “होय, ही माझी योजना आहे. मला ऑलराउंडर म्हणून खेळायचे आहे. माझी तयारी, मेहनत ही अष्टपैलू म्हणून खेळण्यासाठी आहे. जर काही वाईट झाले तर मला माहित नाही. मला चांगले, मजबूत वाटत आहे आणि शेवटी, वेळ सांगेल.” एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा हार्दिक, आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करणार आहे आणि एक नेता म्हणून त्याच्या वाढीमध्ये दिग्गज कर्णधाराच्या भूमिकेबद्दल उघड केले. 28 वर्षीय खेळाडूने सांगितले की, जेव्हा तो संघात आला तेव्हा तो खूप कच्चा होता आणि धोनीने त्याला खूप स्वातंत्र्य दिले आणि चुका करण्यासाठी जागा दिली.
“मी प्रत्येकाकडून खूप काही शिकलो आहे, विशेषत: माही भाई. जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा मी कच्चा होतो. त्याने मला ज्या प्रकारे तयार केले - त्याने मला खूप स्वातंत्र्य दिले. मी माझ्या स्वतःच्या चुका कराव्यात आणि शिकावे अशी त्याची इच्छा होती. मला वाटायचे की तो खूप काही का बोलत नाही पण नंतर मला कळले की मी स्वतः शिकावे जेणेकरून मी अधिक जगू शकेन आणि कठोर होऊ शकेन,” वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणाला. अष्टपैलू म्हणून हार्दिकचे पुनरागमन आयपीएल 2022 पासून निश्चित असल्याचे मानले जात आहे कारण अहमदाबाद फ्रँचायझीने त्याची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे. हार्दिक सोबत, गुजरात-आधारित संघाने अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खान आणि शुभमन गिल यांचीही निवड केली आहे.