दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध त्यांच्या पुढील आयपीएल (IPL) 2022 सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असतील, अशी आशा दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी दिल्लीला त्यांचे परदेशी स्टार नॉर्टजे, वॉर्नर आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांची मोठी कमतरता भासली. मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करूनही पुण्यात शनिवारी झालेल्या त्यांच्या दुसऱ्या आयपीएल 2022 सामन्यात दिल्लीला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. नॉर्टजे मुंबईत पोहोचला झाला आहे परंतु आयपीएल लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेला वेगवान गोलंदाज अजूनही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पाठीच्या आणि नितंबाच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकनंतर नॉर्टजे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. (IPL 2022, GT vs DC Match 10: रनआऊटमुळे तुटली ऋषभ पंत - ललित यादव यांची जोडी, दिल्ली कर्णधाराने ‘या’ कारणामुळे पंचांकडे व्यक्त केली नाराजी)
दुसरीकडे, वॉर्नर पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळला असल्यामुळे तो उशिराने भारतात पोहोचला. लाहोरमध्ये सुरू असलेल्या मर्यादित मालिकेसाठी त्याला ऑस्ट्रेलिया संघातून वगळण्यात आले होते. “मला वाटते की नॉर्टजे 100 टक्के क्षमतेने आणखी चार किंवा पाच षटकांचा स्पेल पार करावा लागेल आणि मग मला वाटते की जर त्याला CSA कडून मंजुरी मिळाली तर तो खेळण्यासाठी फिट होईल. आमच्या पुढच्या सामन्यासाठी आम्हाला आणखी काही दिवस मिळाले आहेत, त्यामुळे आशा आहे की तो त्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असेल.” पॉन्टिंग म्हणाला.
दुसरीकडे, पाँटिंगने पुष्टी केली की वॉर्नर त्यांच्या पुढील सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असेल. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दिल्ली लखनऊविरुद्ध मैदानात उतरणार आहे. तसेच मिचेल मार्शच्या उपलब्धतेबद्दल चिंता होती कारण तो हिपच्या दुखापतीमुळे पाकिस्तानमधील मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडला होता परंतु पॉन्टिंगला विश्वास आहे की तो लवकरच उपलब्ध होऊ शकतो. “पुढच्या सामन्यासाठी डेव्ही आणि नंतरच्या सामन्यासाठी मिच मार्श उपस्थित असावा,” पॉन्टिंग म्हणाला. दरम्यान, आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली सध्या एक विजय आणि एक पराभवानंतर चौथ्या स्थानावर आहे.