IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्यात दिल्लीचा फलंदाज ललित यादव (Lalit Yadav) याच्या रनआऊटवरून गोंधळ निर्माण झाला. दिल्लीच्या डावाच्या 12व्या षटकात यादव धावबाद झाल्यामुळे कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) नाराज दिसला आणि त्याने पंचांशी वाद घातला. पंतने शॉट मारल्यावर चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला पण त्याने गोलंदाज विजय शंकरकडे (Vijay Shankar) चेंडू फेकला आणि शंकरने स्टंप उखडले. मात्र विजयचा पाय लागल्याने बेल्स आधीच पडल्याचे दिसून आले असले तरीही थर्ड अंपायरने ललितला बाद घोषित केले. यानंतर कॅप्टन पंत मैदानावरील पंचांकडे पोहोचला आणि त्याने त्याचे कारण विचारले. जेव्हा बेल्स क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून पडतात तेव्हा संपूर्ण स्टंप उखडून टाकावा लागतो. यानंतर पंचांनी पंतला सांगितले की शंकरच्या पायामुळे फक्त एक बेल्स पडली होती, तर दुसरी स्टंपवर राहिली होती. या कारणामुळे पंचांनी ललितला आऊट दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)