IPL 2021: भारतात कोरोना महामारी (Coronavirus Pandemic) संकट काळात इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 वा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. या महामारीने भारत अधिक चांगल्याप्रकारे सामना करू शकेल यासाठी संघ स्वत:च्या मार्गाने योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत. दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज यासारख्या संघांनी पैशाने स्वतःकडून मदत केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) टीम देखील आता मदतीसाठी मैदानात उतरणार आहे. दरवर्षी आयपीएलच्या (IPL) एका सामन्यात हिरव्या जर्सीत खेळणारी ही टीम यंदा निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने स्वतः एक अतिशय खास घोषणा केली की यंदाच्या मोसमात त्याचा संघ निळी जर्सी परिधान करून मैदानात उतरेल. (Mission Oxygen साठी ‘गब्बर’ Shikhar Dhawan कडून 20 लाखांसह IPL मधील बक्षीस रक्कम दान देण्याची घोषणा)
कोरोना संकटात काळात मोलाची जबाबदारी बजावणाऱ्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांच्या कामाची जाणीव करून दिली जाणार असून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी बेंगलोर संघ आगामी सामन्यात ही खास जर्सी परिधान करणार आहे. शिवाय, सामन्यानंतर या जर्सीचा लिलाव केला जाईल आणि मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली जाणार आहे. आरसीबीने लिहिले, “या हंगामात आरसीबी आगामी सामन्यांपैकी 1 मध्ये विशेष ब्लू जर्सी घालून खेळेल ज्यावर मागील वर्षी पीपीई किट घालून आणि महामारीविरुद्ध लढ्यात अग्रगण्य असलेल्या सर्व आघाडीच्या नायकांबद्दल आमचा आदर व्यक्त करण्यासाठी आणि एकता दर्शवण्यासाठी सामना किटवर मुख्य संदेश लिहिलेला असेल.” त्यांनी पुढे म्हटले की, “ऑक्सिजन संबंधित हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरला पाठिंबा देणार्या आमच्या पूर्वीच्या आर्थिक योगदानामध्ये पैसे जमा करण्यासाठी आरसीबी या खेळावरील सर्व स्वाक्षरी केलेल्या खेळाडू जर्सींचा लिलाव देखील करेल.”
RCB has identified key areas where much needed help is required immediately in healthcare infrastructure related to Oxygen support in Bangalore and other cities, and will be making a financial contribution towards this. pic.twitter.com/jS5ndZR8dt
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 2, 2021
दरम्यान, आरसीबीने त्यांच्या आयपीएल 14 मोहिमेची दणदणीत सुरुवात केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत आणि 5 विजयांसह गुणतालिकेत तिसर्या स्थानावर आहेत. बेंगलोरचा पुढील सामना 3 मे रोजी अहमदाबाद येथे इयन मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) होईल. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात त्यांनी केकेआरचा सहज पराभव केला होता.