मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा 17वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिंदाबरम स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार केएल राहुलच्या आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने 9 विकेटच्या फरकाने सामना जिंकला व सलग तीन पराभवानंतर संघाची गाडी विजयपथावर परतली. हा सामना जिंकण्याबरोबरच पंजाब किंग्जने पॉइंट टेबलमध्ये 2 महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी मागील हंगामात संघाच्या विजेतेपदात क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे संघ सहावे विजेतेपदाच्या प्रयत्नात असताना डी कॉक याच्याकडून पुन्हा एकदा मोठी अपेक्षा होती पण हा हंगाम डी कॉकसाठी खूप खराब ठरत आहे. याआधी त्याने 3 सामन्यांत फ्लॉप झाला असून मागील सामन्यात 5 चेंडूत केवळ 3 धावा करून तंबूत परतला. 2019 मध्ये मुंबईच्या पलटनमध्ये सामील झालेल्या डी कॉकला संघाने यंदाच्या हंगामासाठी 2.8 कोटी रुपयात रिटेन केले आहे. (MI vs PBKS IPL 2021 Match 17: मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का, रोमांचक सामन्यात पंजाबचा 9 विकेटने विजय)
डी कॉकच्या सलग खराब कामगिरीनंतर त्याला ट्रोल केले जात असून त्याला आगामी सामन्यांसाठी मुंबईच्या ‘पलटन’च्या बाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्णधार रोहित शर्माने डी कॉकच्या जागी ख्रिस लिनचा समावेश केला पाहिजे असे मत चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे डी कॉक यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने क्रिस लिनला संधी मिळाली होती ज्याने अन्य फलंदाज अपयशी ठरत असताना चेपॉकच्या मैदानावर संयमी खेळी केली आणि 49 धावा ठोकल्या होत्या तर डी कॉक तीन सामन्यात मिळूनही तितक्या धावा करू शकलेला नाही. या सामन्यात धाव घेण्याच्या गोंधळात लिनसोबत फलंदाजी खेळपट्टीवर असणारा कर्णधार रोहित शर्मा रनआऊट झाला होता.
Again disappointing batting performance from @mipaltan. @mipaltan should give chance to @lynny50 in place of de kock or ishan kishan🤔.
Lynn can give a good start to MI. We wanna see that vintage @hardikpandya7 💙💙#OneFamily
— RJ (@rajnish__joshi) April 23, 2021
सामन्याबद्दल बोलायचे तर मुंबईने पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तरात पंजाबने 1 विकेट गमावून 17.4 ओव्हरमध्ये विजय मिळवला. पंजाबकडून कर्णधार राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या तर गेलने नाबाद 43 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईसाठी राहुल चाहरने एकमेव विकेट घेतली.