रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs PBKS: युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अन्य गोलंदाजांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) शारजाह येथे पंजाब किंग्सवर (Punjab Kings) मात केली. पंजाबविरुद्ध या विजयासह बेंगलोरने यंदाच्या प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर अंतिम चार संघात प्रवेश करणारा बेंगलोर तिसरा संघ ठरला आहे. आरसीबीने (RCB) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 158 धावाच करू शकला. परिणामी संघाला 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) पंजाबसाठी केलेल्या 57 धावाही व्यर्थ ठरल्या. मयंकव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुलने 39 धावांचे योगदान दिले. तसेच मोईसेस हेन्रीक्स 12 धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे आरसीबीसाठी चहलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेचब जॉर्ज गार्टन आणि शाहबाज अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2021, RCB vs PBKS: आउट की नॉटआउट? बेंगलोर-पंजाब सामन्यात असे काय घडले की पंचांशी जाऊन भिडला केएल राहुल)

आरसीबीने शारजाह येथे दिलेल्या सर्वाधिक धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि मयंकची जोडी सलामीला उतरली. दोघांनी बेंगलोर गोलंदाजांची धुलाई करत पंजाब संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. राहुल आणि मयंकमध्ये पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. यानंतर मयंकसोबत संघाला दमदार सुरुवात करुन देणाऱ्या राहुलला अखेर 39 धावनावर शहबाज अहमदने माघारी धाडलं आणि सलामी जोडी मोडली. यानंतर मयंकने संघाला उत्तम सुरुवात करुन देत 36 चेंडूत वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केलं. राहुल बाद झाल्यावर निकोलस पूरन अग्रवालला साथ देऊ शकला नाही आणि चहलच्या चेंडूवर पडीक्कलने पूरनची कॅच घेतली. यानंतर अर्धशतक करून आरसीबीची डोकेदुखी बनलेल्या आणि चांगल्या लयी असलेला मयंक अग्रवालला चहलने बाद केले. चहलने मयंक पाठोपाठ त्याच ओव्हरमध्ये सरफराज खानला भोपळा फोडू न देता बाद केले. अखेरीस शाहरुख खान आणि मोईसेस हेन्रिक्स यांनी जोडी जमवून पंजाबला विजयीरेष ओलांडून देत संघात प्लेऑफ जागेसाठी आव्हान कायम ठेवले.

यापूर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय पडिक्क्ल व विराटने योग्य ठरवला आणि संघाला 68 धावांची सलामी दिली. पडिक्क्ल 40 धावा करुन बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 57 धावांची अर्धशतकी खेळी करत बँगलोरला दीडशतकी मजल मारुन दिली. एबी डिव्हिलियर्सने 23 धावांचे योगदान दिले. पंजाबकडून हेन्रिक्सने 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने तीनही विकेट अखेरच्या षटकात मिळवले.