IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार इयन मॉर्गनवर (Eoin Morgan) मुंबईत चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरोधात झालेल्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल (IPL) नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॉर्गनला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. भारतात सुरु असलेल्या आयपीएल 2021 मध्ये स्लो ओव्हर-रेटचा फटका सहन करणारा एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतर इयन मॉर्गन तिसरा कर्णधार बनला आहे. “आयपीएलच्या आचारसंहिता अंतर्गत मोसमत कमीतकमी ओव्हर रेटच्या गुन्ह्यांबाबत हा मोसमाचा पहिलाच अपराध असल्याचे मॉर्गन यांना 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे,” आयपीएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आयपीएलच्या स्लो ओव्हर-रेटच्या (IPL Slow Over-Rate) नियमानुसार पहिल्यांदा नियमांचा भंग केल्यास दंड 12 लाख रुपये आहे तर दुसर्या गुन्ह्यासाठी दंड दुप्पट, 24 लाख रुपये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कर्णधाराबरोबरच प्लेइंग इलेव्हनच्या प्रत्येक सदस्यालाही या गुन्ह्यादरम्यान मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. (Mumbai Indians Vs Delhi Capitals: मुंबई इंडियन्स संघाचे 'तेलही गेले आणि तुपही गेले', रोहित शर्मा याला 12 लाख रुपयांचा दंड)
शिवाय, एकाच मोसमात तिसऱ्यांदा नियम मोडल्यास कर्णधारावर सामना बंदी घालण्यात येईल आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज आक्रमक बॅटिंग करत असताना मॉर्गनला गोलंदाज व क्षेत्ररक्षणावर काम करावे लागले. अखेर सीएसकेने सामन्यात 220 धावसंख्या उभारली. फाफ डु प्लेसिसने नाबाद 95 आणि रुतूराज गायकवर्डने क्लासी 64 धावांची खेळी केली. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरोधात झालेल्या सलामीच्या सामन्यानंतर एमएस धोनीला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. त्यानंतर, मंगळवारी मुंबई इंडियन्सने चेन्नई येथे कॅपिटल्सविरुद्ध स्लो ओव्हर-रेटमुळे रोहित शर्मावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
दुसरीकडे, सलग तिसऱ्या पराभवानंतर मॉर्गनच्या नाईट रायडर्सचा पुढचा सामना 24 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरोधात होणार आहे. हा सामना देखील संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. यापूर्वी संघासाठी चांगली बातमी म्हणजे त्यांचा तडाखेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल फॉर्ममध्ये परतला आहे. सीएसके विरोधात संघ अडचणीत असताना रसेलने चौकार-षटकारांची बरसात करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. त्यानंतर, पॅट कमिन्सने संघाला विजयाच्या जवळ नेले पण दुसऱ्या टोकावरून विकेट पडल्यामुळे संघाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले.