IPL 2021: आयपीएल लिलावात ‘हे’ 5 युवा क्रिकेटर बनले करोडपती, एकाला मिळाले तब्बल 14 कोटी
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या आवृत्तीचा लिलाव चेन्नईमध्ये असून जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने अव्वल खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करण्यासाठी अनेक फ्रँचायझींमध्ये आकर्षक चुरस पाहायला मिळाली. आगामी आयपीएल (IPL) हंगामात आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी फ्रँचायझींनी एक कणखर संघ तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि पैसा खर्च केला. सर्वांना चकित करत क्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल आणि झे रिचर्डसन (Jhye Richardson) यासारख्या खेळाडूंना आश्चर्यकारक किंमतीवर संघानी खरेदी केले. यादरम्यान, काही युवा खेळाडूंनी देखील आपले लक्ष वेधले. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर फ्रँचायझी उदार झाले आणि कमी वयातच कोट्याधीश बनले. (IPL 2021: काय सांगता! Chris Morris नव्हे, ‘हा’ भारतीय आहे आयपीएल इतिहासातील 'Most Expensive Player', मिळते इतकी रक्कम)

1. झे रिचर्डसन (वय 24 वर्ष, 14 कोटी)

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिचर्डसनला 2021 च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केले. या युवा प्रतिभावान ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची बेस प्राइस दीड कोटी रुपये होती आणि 2020-21 बिग बॅश लीगमध्ये शानदार कामगिरीनंतर तो लिलावात मोठी किंमत आकर्षित करणाऱ्या खेळाडूंमधील प्रबळ दावेदार होता.

2. शाहरुख खान (वय 25 वर्ष, 5.25 कोटी)

प्रिती झिंटाने तिच्या पंजाब किंग्जमध्ये शाहरुख खानला 5.25 कोटी रुपयांत विकत घेतल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. शाहरुखने यंदा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये 220 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

3. टॉम कुरन (वय 25 वर्ष, 5.25 कोटी)

2020 आवृत्तीत त्याने केलेल्या कामगिरीचा विचार करता इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज टॉम कुरन फ्रँचायझीकडून बोली आकर्षित करण्याबाबत भाग्यवान ठरला. कुरनने पाच सामन्यात 11.61 च्या इकॉनॉमी रेटने सहा विकेट घेतल्या. दिल्ली कॅपिटलने टॉम कुरन आयएनआर 5.25 कोटीमध्ये खरेदी केले. कुरनची गोलंदाजी स्लो खेळपट्टीवर घातक ठरू शकते.

4. रिले मेरेडिथ (वय 24 वर्ष, 8 कोटी)

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथने पंजाब किंग्स संघाचे लक्ष वेधले आणि 8 कोटी रुपयात संघात समावेश केला. त्यांची बेस प्राईस 40 लाख रुपये होती, परंतु पंजाबने अधिक किंमत देत पंजाबने त्याला संघात सामील केले. रिलीने बीबीएलमध्ये स्टार कामगिरी केली असून 34 सामन्यांत 23.6 च्या सरासरीने 43 विकेट घेतल्या आहेत.

5. चेतन साकारिया (वय 22 वर्ष, 1.2 कोटी)

राजस्थान रॉयल्सने सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाला 1.2 कोटी रुपयांत विकत घेतले. साकारियाची बेस प्राईस 20 लाख रुपये होती आणि रॉयल्सने त्याला पाच पट अधिक किंमतीत खरेदी केले. यावर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पाच टी-20 सामन्यात त्याने केवळ 8.16 च्या सरासरीने आणि 4.9 च्या जबरदस्त इकॉनॉमीने 12 विकेट घेतल्या.