IPL 2021: 'या' 5 दिग्गज खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल ठरू शकते शेवटची, यादीत भारतीय  क्रिकेटपटूंचाही समावेश
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Instagram)

IPL 2021: आयपीएल (IPL) 2021 एक ऐतिहासिक ठरू शकते. मागील वर्षी कोविड-19 महामारीने लीगला यूएईमध्ये (UAE) हलवायला भाग पडायला लागले होते मात्र यंदा बीसीसीआय (BCCI लीगचे भारतात परत स्वागत करण्यास सज्ज होत आहे. आगामी आवृत्तीत भारतीय दिग्गज सचिन तें)डुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे बहुप्रतिक्षित पदार्पण पाहायला मिळू शकते. 21 वर्षीय अर्जुनने अखेर आगामी रोख समृद्ध लीगसाठी नोंदणी केली आहे आणि आता त्याला फ्रँचायझी खरेदी करते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयपीएल 2021 लिलावासाठी नोंदणी केलेला माजी वेगवान वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत (S Sreesanth) 8 वर्षानंतर लीगमध्ये कमबॅक करू शकतो. वेगवान गोलंदाजाने यापूर्वी भारताच्या घरेलू क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. काही खेळाडू स्पर्धेत पदार्पण आणि कमबॅक करू शकतात तर आगामी आवृत्ती काही दिग्गजांसाठी अखेरची ठरू शकते. आज या लेखात आपण अशाच 5 दिग्गज खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत जे आगामी हंगामानंतर निवृत्त होऊ शकतात. (IPL 2021 Auction: ‘या’ 3 खेळाडूंची बेस प्राईज आहे सर्वात जास्त, फ्रँचायझी कदाचित लगावतील बोली)

एमएस धोनी (MS Dhoni) 

आयपीएलचा दिग्गज आणि माजी कर्णधार 40 वर्षांचा झाल्याने आगामी 2021 हंगाम त्याच्यासाठी अखेरचा ठरू शकतो. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तीन आयपीएल विजेतेपदं जिंकली आहेत. मागील हंगामात, संघ पॉईंट्स टेबलच्या तळाशी होता मात्र यंदा ते पुनरागमन करू इच्छित असतील. धोनीला खेळाबद्दलचा अनुभव व ज्ञान पाहता तो सल्लागार म्हणून निश्चितपणे फ्रँचायझीशी संबंधित असू शकतो.

इमरान ताहीर (Imran Tahir)

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू ताहीर देखील यंदा आंतील वेळा आयपीएल खेळताना दिसु शकतो. युएईमध्ये मोजके सामने सामने खेळलेल्या ताहीरला यंदा चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिटेन करत सर्वानाच चकित केलं. शिवाय, सीएसकेच्या 'डॅडीज आर्मी'चा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे आणि आगामी आयपीएल हंगामात तो 42 वर्षांचा होईल. मात्र, त्याचे वय आणि फॉर्म पाहता त्याला पुढील वर्षासाठी फ्रँचायझी कायम ठेवेल याची शक्यता कमी असल्याने यंदाचा हंगाम या आफ्रिकी गोलंदाजासाठी अखेरचा ठरू शकतो.

हरभजन सिंह (Harbhajan Singh)

आयपीएलचा 14वा शेवटचा हंगाम अखेरचा असणारा भज्जी दुसरा खेळाडू ठरू शकतो. हरभजन लीगच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांपैकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली आहे आणि त्यानंतर ‘वैयक्तिक कारणास्तव’ गेल्या वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती, मात्र आगामी लिलावात त्याला एखादा खरेदीदार मिळतो की नाही हे पाहणे सर्वात आधी रंजक ठरेल.

अंबाती रायुडू (Ambati Rayudu)

रायुडू आता बर्‍याच हंगामापासून सीएसके फ्रँचायझीचा भाग होता. यापूर्वी त्याने या संघाला भूतकाळात अनेक मोठे सामने जिंकण्यास मदत केली आहे, परंतु गेल्या मोसमात त्याचा फॉर्म खराब राहिला आहे. 2019 मध्ये वर्ल्ड कपच्या संघात निवड न झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पण त्याने पुन्हा पुनरागमन केले. आयपीएल 2022 साठी फ्रँचायझी नवीन संघ उभारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याने रायुडू त्यांच्या योजनांचा भाग असण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे आयपीएल 2021 नंतर लीगमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

क्रिस गेल (Chris Gayle)

किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी सार्वधिक धावा करणारा फलंदाज असला तरी, त्याचे वय आणि पुढच्या वर्षी मेगा लिलाव यामुळे त्याला फ्रॅन्चायझी त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा विचार करू शकते. मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझी पुढील 3 वर्षांसाठी संघ तयार करतात आणि गेल 42व्या वर्षी कोणत्याही संघाच्या योजनांचा भाग होण्याची शक्यता कमीच आहे. विशेष म्हणजे, तो आयपीएलमध्ये एकदा अनसोल्ड राहिला आहे आणि 2018 मध्ये, तिसर्‍यांदा त्याचे नाव समोर आल्यानंतर केवळ किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी बोली लावली.

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथे 18 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव, हरभजन अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी लिलावात बोली लगावली जाईल.