IPL 2021, CSK vs KKR Final: Eoin Morgan वर का आहे MS Dhoni भारी, फायनलपूर्वी माजी KKR कर्णधाराचे मोठे विधान
एमएस धोनी आणि इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात सीएसकेने (CSK) याआधी तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर केकेआरने (KKR) दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. तथापि, धोनी आणि इयन मॉर्गन (Eoin Morgan) या दोघांनी या दोन्ही कर्णधारांना यंदाच्या मोसमात विशेष धावा करता आल्या नाहीत. माहीने पहिल्या क्वालिफायर सामन्यात शेवटच्या षटकात सलग तीन चौकार खेचून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. दरम्यान, केकेआरचे माजी कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताही धोनी मॉर्गनपेक्षा चांगला दिसत आहे. (CSK vs KKR IPL 2021 Final: चेन्नई सुपर किंग्सने 5 आयपीएल फायनलमध्ये चाखली आहे पराभवाची धूळ, एमएस धोनीसमोर कठीण आव्हान)

ESPNCricinfo शी बोलताना गंभीर म्हणाला, “मॉर्गनने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली कारण तो त्याच्या फॉर्मशी झुंजत होता. त्यानंतर तो फलंदाजी क्रमवारीत स्वत:ला खाली खेचत राहिला आणि जर तुम्ही ते करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमच्यावर अधिक दबाव आणता. आपण दोन्ही कर्णधारांच्या स्वरूपाची तुलना करू शकत नाही कारण एमएसने बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही आणि मॉर्गन खेळत आहे व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्वही करत आहे. फॉर्मच्या दृष्टिकोनाने पहिले तर मॉर्गनचा फॉर्म धोनीपेक्षा खराब आहे.” उल्लेखनीय म्हणजे धोनीच्या नेतृत्वात CSK टीम फायनल खेळण्याची ही 9 वी वेळ आहे. तर मॉर्गनने गेल्या वर्षी, 2020 आयपीएलच्या मध्यावरच केकेआरच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली होती.

दरम्यान यापूर्वी 2012 मध्ये अंतिम सामना केकेआर आणि चेन्नई यांच्यात झाला होता, ज्यामध्ये कोलकाताने विजय मिळवला होता. अशा स्थितीत धोनीच्या वृद्ध वाघांना त्या पराभवाचा हिशेब चुकता करायला आवडेल. याशिवाय युएईमध्ये येऊन मॉर्गन संघाचे भाग्य प्रचंड चमकले आहे आणि संघाने पहिले एलिमिनेटरमध्ये बेंगलोर आणि नंतर क्वालिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत फायनलचे तिकीट बुक केले होते.