मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्रिस लिन (Photo Credit: PTI)

IPL 2021: चेन्नईच्या (Chennai) स्लो विकेटवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सावध सुरुवात झाली आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच लयीत परतत होता, जेव्हा त्याचा सलामी साथीदार क्रिस लिन (Chris Lynn) याच्याशी झालेल्या गोंधळामुळे त्याला रनआऊट होऊन पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले. चौथ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळला आणि मागे परतण्यापूर्वी चोरटी धाव घेण्यासाठी धावला. रोहित आधीच खेळपट्टीचा मध्यावर येऊन पोहचला होता जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने संधीचा फायदा घेत टीम इंडिया सहकाऱ्याला धावबाद करत माघारी धाडलं.5 वेळा आयपीएल चॅम्पियन्ससाठी पहिल्या सामना खेळणाऱ्या लिनच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट दिसून येत होता. त्याने आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि 35 चेंडूत 49 धावा केल्या, पण आपली चूक मुंबईसाठी आपल्या पहिल्या सामन्याला अखेरचे बनवू शकते असे 31 वर्षीय फलंदाजाला वाटते. (IPL 2021: विराट कोहलीच्या निर्णयावर युवराज सिंहने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, RCB कॅप्टनने दिले स्पष्टीकरण)

“हे पाहा, मी थोडा घाबरलो होतो, मला यात काही शंका नाही. मुंबईसाठी पहिला सामना, आणि रोहितबरोबर देखील मी पहिल्यांदा फलंदाजी करत होतो. क्रिकेटच्या खेळात हे घडते. मला वाटलं की रन आहे, आणि मग धाव नव्हती. पण जर मी त्याच्या पुढे जाऊ शकलो असतो आणि माझी विकेटची बळी द्यायची असती तर मी नक्कीच केले असते परंतु तसे झाले नाही. मी म्हटल्याप्रमाणे असे होते, पण हो मी स्वतःवर थोडेसे अधिक दबाव आणतो. पहिल्या गेममध्ये आपल्या कर्णधाराला धावबाद करणे हे आदर्श नाही. माझा पहिला सामना शेवटचा असू शकतो, कोणाला माहित? पण असं असलं तरी, ही गेममध्ये घडणारी एक स्फूर्त गोष्ट होती. हे छान झाले असते (जर रनआउट झाले नसते); तो चेंडू छान मारत होता आणि शेवटी आम्ही 10 किंवा 15 धावा कमी करत होतो. त्याने निश्चितपणे फरक आणला असता, परंतु या सामन्यात पुष्कळ घटक होते, केवळ धावबाद नाही,” लिनने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटले.

दरम्यान, आठवड्याच्या सुरूवातीस भारतात दाखल झाल्यानंतर 7 दिवसांचा क्वारंटाइन असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या जागी लिनला सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. गेल्या काही हंगामांत डी कॉक संघाचा यष्टिरक्षक आणि सलामीसाठीची पहिली पसंती आहे.