IPL 2021: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) संघाने दोन विकेटने विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा सर्वात अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. कर्णधार विराटच्या या निर्णयावर माजी अष्टपैलू युवराज सिंहने (Yuvraj Singh) डिव्हिलियर्सच्या मधल्या फळीत फलंदाजी करण्यावर निराशा व्यक्त केली आहे. युवराजने यासंदर्भात ट्विट केले आणि लिहिले की, “एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवले गेले हे मला समजत नाही. सलामीनंतर कोणत्याही संघाचा सर्वोत्तम फलंदाज टी-20 मध्ये तीन किंवा चार क्रमांकावर खेळला पाहिजे. असे माझे मत आहे.” सामना संपल्यानंतर विराट कोहलीला डिव्हिलियर्सच्या लोअर ऑर्डरबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. (MI vs RCB IPL 2021 Match 1: मुंबईविरुद्ध Harshal Patel याची कमाल, रोहित शर्माची नकोशा विक्रमाची नोंद, पहा ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड)
तो म्हणाला की, “एबी डिव्हिलियर्स बहुमुखीपणाचा खेळाडू आहे आणि विरोधी संघात त्याच्याबद्दल भीती आहे. आमच्याकडे फलंदाजीची सखोलता आहे, ज्याचा आम्हाला फायदा घ्यायचा होता.” विराट कोहली म्हणाला, “डीव्हिलियर्स बहुधा बहुधा अद्वितीयपणा असलेला एकमेव खेळाडू आहे. या स्लो खेळपट्टीवर त्याने आज जे केले ते नेहमीच करू शकतो. आपल्याला शेवटच्या वेळेस काही पर्याय ठेवायचे आहेत जेणेकरून खेळ अद्याप संपलेला नाही असे विरोधी संघाला वाटेल.” सामन्यात एबी डिव्हिलियर्सने 27 चेंडूत 48 धावा केल्या आणि सामन्याचे चित्रच बदलून टाकले. डिव्हिलियर्सने आपल्या खेळीत दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. शेवटच्या ओव्हरमध्ये तो बाद झाला, ज्यामुळे सामना रोमांचक स्थितीत पोहचला.
Don’t understand @ABdeVilliers17 batting at no 5 !!? 🤷♂️your best batsmen after opening have to come at no 3 or no 4 in t20 just an opinion #MIvRCB #IPL2021
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 9, 2021
टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना मुंबईने 9 विकेट गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात 8 गडी गमावलेल्या बेंगलोरने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. गोलंदाजीत हर्षल पटेलने आरसीबीकडून आश्चर्यकारक कामगिरी करत 5 गडी बाद केले तर संघ अडचणीत असताना डिव्हिलियर्सने तुफानी फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला.