MI vs RCB IPL 2021 Match 1: मुंबईविरुद्ध Harshal Patel याची कमाल, रोहित शर्माची नकोशा विक्रमाची नोंद, पहा ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

MI vs RCB IPL 2021 Match 1: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या सामन्यात विजयी सलामी दिली आहे. आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते जे बेंगलोर संघाने 8 विकेट्स गमावून अखेरच्या चेंडूमध्ये गाठले. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) सर्वाधिक 48 धावांची शानदार खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आरसीबीने (RCB) मुंबईवर निसटता विजय मिळवला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही करत सामन्याच्या अखेरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. हर्षल पटेलने (Harshal Patel) शेवटची धाव घेत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. सामन्यात काही प्रमुख रेकॉर्ड ही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (MI vs RCB IPL 2021 Match 1: AB de Villiers याचा तडाखा! मुंबईची परंपरा कायम; रॉयल चॅलेंजर्सचा रोमांचक सामन्यात 2 विकेटने निसटता विजय)

1. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल 2021 च्या सलामीच्या सामन्यात 5 विकेट घेत इतिहास रचला आहे. हर्षलने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत 5 गडी बाद केले आणि मुंबईविरुद्ध पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

2. आरसीबीसाठी हर्षल पटेल तिसऱ्या सर्वाधिक गोलंदाजी आकडेवारीची नोंद केली. हर्षलपूर्वी जयदेव उनाडकट (5/25) आणि अनिल कुंबळेने (5/5) अशी गोलंदाजीची नोंद केली होती.

3. 2020 मधील अखेरच्या पाच सामन्यात आरसीबी संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, सलग पाच पराभवानंतर आरसीबीने पहिला विजय मिळवला आहे.

4. रोहित शर्मा आता आयपीएलच्या इतिहासात बहुतेक रनआऊटमध्ये सामील होणार (स्वत: 11 वेळा, 25 वेळा साथीदाराला आऊट केले) फलंदाज ठरला आहे.

5. मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात पहिली धाव घेणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितने यापूर्वी 2015, 2018, 2020 आणि आता 2021 मध्ये आयपीएलची पहिली धाव घेतली आहे.

6. मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहली 33 धावा करून आऊट झाला. मात्र, आपल्या खेळीसह विराट टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

7. आयपीएल 2021 मध्ये बाद झालेला रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला.