MS Dhoni IPL 2021 Salary: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएल (IPL) टीम चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन एमएस धोनीने (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामापूर्वी स्पर्धेत एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सीएसके कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमधून दीडशे कोटींची कमाई करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनी आयपीएल 2021 मध्ये पुन्हा एकदा सीएसकेचे (CSK) आणखी एका मोसमात नेतृत्व करताना दिसेल. धोनीला यंदाच्या हंगामासाठी तीन वेळा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्सने 15 कोटी रुपयात रिटेन केले. यासह धोनीने कमाईच्या बाबतीत 150 कोटी रुपयांचा टप्पा गाठला. धोनीने यापूर्वी सीएसके आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiant) संघाकडून एकूण 137.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. यांनतर सीएसकेने आयपीएल 2021 मध्ये त्याला 15 कोटी रुपये कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने धोनीने आयपीएलमध्ये कमाईच्या बाबतीत 150 कोटी रुपयांचा आकडा गाठला आणि असं करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. (IPL 2021: RCB ने रिटेन करत AB de Villiers 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा बनला पहिला विदेशी क्रिकेटर, टॉप-3 मध्ये भारतीयांचे अधिराज्य)
लक्षात घेण्यासारखे म्हणजे धोनीला चेन्नई सुपर किंग्सने 2008 मध्ये आयोजित पहिल्या आयपीएलसाठी 6 कोटींमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या उद्घाटन आवृत्तीत तो सर्वात महागडा खेळाडू होता. धोनीने 2010 पर्यंत सीएसकेद्वारे प्रत्येक हंगामात 6 कोटी रुपये मिळवले. 2011 मध्ये त्याला सीएसकेने 8.28 कोटी रुपये कायम ठेवले होते. पुढच्या तीन हंगामांमध्ये धोनीने 8.28 कोटी रुपये कमावले आणि त्यानंतर, 2014 आणि 2015 मध्ये त्याला 12.5 कोटी रिटेन केले. सीएसकेवर फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षाच्या बंदीनंतर पुणे फ्रँचायझीने धोनीला 2016मध्ये दोन हंगामासाठी 12.5 कोटी रुपयात खरेदी केले. त्यानंतर, 2018 मध्ये सुपर किंग्सने कमबॅक केलं आणि धोनीला 15 कोटींमध्ये कायम ठेवले आणि तेव्हापासून माजी भारतीय कर्णधार सीएसकेच्या येलो जर्सीमध्ये आहे. शिवाय, यंदाच्या हंगामातल्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावाआधी त्याला तितकीच रक्कम देत सीएसकेने आयपीएल 2021 मध्ये रिटेन केले आहे.
दरम्यान, आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आजवर आयपीएलमधून एकूण 146.6 कोटी रुपये कमाई केली आहे. डेक्कन चार्जर्सपासून आयपीएल करिअरची सुरुवात करणारा रोहित 2011 पासून मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. रोहितला हंगामात 3 कोटी रुपये मिळाले होते आणि मागील वर्षी रोहितला मुंबई इंडियन्सने 15 कोटी रुपयात रिटेन केले. टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीतिसऱ्या स्थानावर आहे. विराटला मागील वर्षी आरसीबीने 17 कोटींमध्ये रिटेन केले होते.