IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई (Chennai) येथे सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लिलावात एक मजेदार दृश्य पाहायला मिळाले जेव्हा देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाबने त्याच्यासाठी 5 कोटी 25 लाख मोजले मात्र, यानंतर फ्रँचायझी सहमालक प्रिती झिंटाची (Preity Zinta) प्रतिक्रिया नक्कीच मिस करण्यासारखी नाही. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विजयात 25-वर्षीय फलंदाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. टूर्नामेंटच्या उपांत्य सामन्यात त्याच्या 19 चेंडूत 40 धावांनी हिमाचल प्रदेशला पराभूत करण्यास मदत केली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या लिलावात तामिळनाडूच्या या घरगुती स्टार फलंदाजाकडे दुर्लक्ष केले गेले होते, मात्र आता शाहरुखने पंजाबसह या मोठ्या कराराने कदाचित ती उणीव भरून काढली असेल. (IPL 2021 Auction: अखेर मोडला युवराज सिंहचा रेकॉर्ड, Chris Morris बनला आयपीएल इतिहासातील महागडा क्रिकेटर)
दरम्यान, शाहरुखला ताफ्यात सामील केल्यानंतर प्रितीच्या आनंदाची सीमाच नव्हती. प्रितीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी असलेली प्रिती जागेवरच नाचू लागली. आयपीएलच्या लिलावाबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिस यंदाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मागील वर्षी स्पर्धेत अपयशी ठरलेल्या मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने रेकॉर्ड-ब्रेक 16.25 कोटी रुपये मोजले. यानंतर, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची देखील भरपूर मागणी पाहायला मिळाली. मॅक्सवेलला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दुसऱ्या सार्वधिक 14.25 कोटी रुपयात खरेदी केले.
When you get a certain "Shahrukh Khan" in your side 😉😉 @PunjabKingsIPL @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/z4te9w2EIZ
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
आयपीएल 2021 साठी चेन्नई येथे 2021 हंगामाच्या लिलावात 291 खेळाडूंवर बोली लगावली जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी झाले होते, मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने लिलावाच्या काही तासांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. यंदाच्या आयपीएल लिलावात 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 291 पैकी 61 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापासून घरगुती खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे.