IPL 2021 Auction Date: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 14व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव चेन्नई येथे येत्या 18 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. बुधवारी आयपीएलने (IPL) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लिलावाची तारीख घोषित केली. भारतातील कोविड-19 परिस्थितीमुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयोजित झालेल्या स्पर्धेच्या पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा आयपीएल चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई (Chennai) येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसानंतर हा लिलाव होईल. भारत आणि इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. 2022 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वीचा हा मिनी-लिलाव असेल. आरसीबीने आठ संघांपैकी सर्वाधिक 10 खेळाडूंना रिलीज केले. (IPL 2021 Auction: आयपीएल 14 साठी ‘या’ 5 खेळाडूंना Retain करणं फ्रँचायझींना पडू शकते महागात)
नव्या हंगामाच्या लिलावात अनेक दिग्गजांचे भाग्य निश्चित होईल. अलीकडेच सर्व 8 फ्रॅन्चायझींनी बर्याच खेळाडूंना रिलीज केले होते, ज्यात काही मोठ्या नावांचा समावेश होता. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) केदार जाधव, किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच यांना बाहेरचा रस्ता दाखवला. वृत्तानुसार, आयपीएलची 14 वी आवृत्ती त्याच्या मूळ एप्रिल ते मे विंडोमध्ये होणार आहे मात्र, बीपीसीआयने अद्याप आयपीएल 2021 चे ठिकाण व तारखा जाहीर केलेली नाहीत. बीसीसीआयने 2020 मध्ये भव्य स्पर्धा आयोजित केली होती आणि युएईमध्ये सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन केले. संघांना केवळ वैयक्तिक जैव-सुरक्षित बबलमध्ये ठेवले असून यजमान ब्रॉडकास्टर्सने कोरोना व्हायरसच्या काळात लीगच्या यशस्वी होस्टिंगसाठी सर्व कठोर प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचं सुनिश्चित केलं.
🚨ALERT🚨: IPL 2021 Player Auction on 18th February🗓️
Venue 📍: Chennai
How excited are you for this year's Player Auction? 😎👍
Set your reminder folks 🕰️ pic.twitter.com/xCnUDdGJCa
— IndianPremierLeague (@IPL) January 27, 2021
दरम्यान, लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी 20 जानेवारी रोजी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, 8 फ्रँचायझींनी एकूण 139 खेळाडूंना कायम ठेवले असून 57 खेळाडूंना रिलीज केले आहे. जाहीर झालेल्या खेळाडूंपैकी लसिथ मलिंगा, शेन वॉटसन आणि पार्थिव पटेल या दिग्गजांनी निवृत्ती जाहीर केली आहे.