आयपीएल लिलाव 2021 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 साठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई (Chennai) येथे पार पडला. काही खेळाडूंवर रेकॉर्ड-ब्रेक बोली लागवण्यात आली तर, काहींना अपेक्षेनुसार भावच मिळाला नाही. आयपीएलच्या (IPL) आगामी 14व्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या मिनी-लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिसवर (Chris Morris) 16.25 कोटी रुपयांची बोली लागली. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहच्या आयपीएल लिलावात (IPL Auction) सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आता मॉरिसच्या नावावर झाला आहे. युवीला 2015 च्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्स, आता दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या नावांवरच नाही तर, काही नवख्या खेळाडूंवरही आयपीएल फ्रँचायझींची चांगलीच कृपा झाली. लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझीनी काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना लिलावापूर्वी संघाने बाहेर केले पण, लिलावात त्यांनी बंपर कमाई केली. (IPL Auction 2021: SRH च्या आयपीएल टेबलवर कोण आहे मिस्ट्री गर्ल Kaviya Maran, नेटकरी म्हणाले- 'नॅशनल क्रश')

1. क्रिस मॉरिस

मागील हंगामात दुखापतीने झगडत असलेल्या मॉरिसला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लिलावापूर्वी रिलीज केले. आरबीसीच्या या निर्णयाचा मॉरिसला फायदा झाला आणि दक्षिण आफ्रिकी गोलंदाज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने मॉरिससाठी लिलावात 16.25 कोटी रुपये मोजले.

2. ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियन फलंदाजासाठी लिलावात 10 कोटी रुपयाचा टप्पा ओलांड्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबने (पूजाब किंग्स) 10.75 कोटी रुपये मोजले होते, मात्र ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला. शिवाय, त्याला एकही षटकार लगावता आला नाही, त्यामुळे पंजाबने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 14.25 रुपये त्यासाठी खर्च केले.

3. कृष्णप्पा गौतम

राजस्थान रॉयल्सकडून 2018 पासून तीन हंगाम खेळणाऱ्या कर्नाटक अष्टपैलूचा चेन्नई सुपर किंग्सने 9.25 च्या मोठ्या रक्कमेह आपल्या ताफ्यात समावेश केला. आयपीएलच्या मागील हंगामात 2 सामने खेळणाऱ्या गौतमला रॉयल्सने सुमार कामगिरीमुळे रिलीज केले होते. गौतमला याचा फायदा झाला आणि सीएसकेने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली.

4. मोईन अली

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मॉरिससह इंग्लंड फिरकीपटू मोईनला देखील रिलीज केले होते. मात्र, भारताविरुद्ध दुसऱ्या चेन्नई टेस्टच्या अंतिम डावात ऑलराउंड खेळीचा मोईनला फायदा झाला आणि चेन्नई सुपर किंग्सने त्याला 7 कोटी रुपयात संघात समावेश केला.

5. नॅथन कोल्टर-नाईल

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन कोल्टर-नाईलला रिलीज केले पण, अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा कोट्याधीश बनला. मुंबईने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवत 5 कोटी रुपयांची रक्कम देत त्याला संघात स्थान दिले.