IPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 चे आयोजन करण्यासाठी आकाश चोपडा यांनी केली तीन देशांची निवड
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) यंदा आयोजित करण्यासाठी स्थान आणि तारखा अद्याप जाहीर होणे बाकी आहे. भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणि नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने 29 मार्च पासून सुरु होणारं आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पण, भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आयपीएल ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्याचा प्रयत्नशील आहे. भारतात आयपीएलचे (IPL) आयोजन होणार की नाही यावरही अद्याप संभ्रम कायम आहे. अशा स्थितीत भारतात स्पर्धेचे आयोजन झाले नाही तर अन्य पर्याय म्हणून भारताचे प्रख्यात भाष्यकार आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी आयपीएल आयोजित करण्यासाठी तीन देशांची निवड केली आहे.  पहिले त्यांनी युएईची निवड केली कारण तिथे तीन स्टेडियम आहेत आणि आयपीएलसारख्या स्पर्धा आयोजित करून ते नक्कीच त्यांची अर्थव्यवस्था पुन्हा सक्रिय करण्यासाठी उत्सुक आहेत. (IPL 2020 Update: आयपीएल 13 भारताबाहेर आयोजित करता येईल; 'या' दोन ठिकाणांचा होत आहे विचार, BCCI ची माहिती)

त्याने मनात ठेवलेला दुसरा कार्यक्रम म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेतील हवाई उड्डाणे पुन्हा सुरू केली गेली आहेत, त्यामुळे श्रीलंका हा एक उत्तम पर्याय आहे. कोरोना व्हायरसशी प्रभावीपणे झुंज देऊन आकाश आपल्या मते श्रीलंका अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यास उत्सुक असतील असे त्यांचे मत आहे. युएई प्रमाणेच श्रीलंकामध्ये देखील तीन स्टेडियम उपलब्ध आहे. शेवटी, त्याने न्यूझीलंडला एक आदर्श ठिकाण म्हणून निवडले कारण त्याने स्वत:ला कोविड-19 मुक्त जाहीर केले होते थापि, संघांसाठी लहान मैदान ही समस्या असू शकते.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, आयपीएलचे हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयोजित केली जाणार आहे. वानखेडे स्टेडियम, डीवाय वाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमसारखी जागा असल्याने सर्व सामने मुंबईत होणार असल्याचे सध्या चर्चेत आहे. वर्षाअखेर बीसीसीआय स्पर्धा आयोजित करण्यासाठी आशावादी आहे, परंतु जर देशभरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर या स्पर्धेला दुसर्‍या देशात स्थानांतरित करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही.