आयपीएलचा (IPL 2020) तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या आयपीएलमधील एका संघाच्या 2 खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 13 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व खेळाडूंची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल 2020 स्पर्धा युएईत खेळवण्यात येणार आहे. यामुळे भारतातून युएईमध्ये दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या निर्बांधांचेही पालन करण्यात आले आहे. 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान एकूण 1 हजार 988 जणांची आरटी-पीसीआर कोविड19 चाचणी करण्यात आली आहे. यात दोन खेळाडूंसह 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्व कोरोनाबाधितांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच आयपीएलच्या वैद्यकीय पथकाद्वारे त्यांचे परीक्षण केले जात आहे, अशीही माहिती बीसीसीआयने दिली आहे. हे देखील वाचा- ENG Vs PAK 1st T20 Cancalled: पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द
एएनआयचे ट्विट-
Upon landing in the UAE, all IPL participants have followed a mandatory testing & quarantine programme. Total of 1,988 RT-PCR COVID tests were carried out between August 20th – 28th. 13 personnel have tested positive of which 2 are players: Board of Control for Cricket in India pic.twitter.com/rXWwSV6T2O
— ANI (@ANI) August 29, 2020
इंग्रजी वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडू म्हणजेच दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बीसीसीआयकडून कोणत्याही संघाचे किंवा खेळाडूचे नाव सांगण्यात आले नाही.